महिलांना समाजात समान दर्जा व वागणूक मिळत नाही . तो पर्यंत महिला सक्षम होणार नाहीत-महिलाध्यक्षा सौ.शौमिका महाडीक.

शिरोली / प्रतिनिधी
     महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी व अधिकार मिळाले, पण महिला सक्षम बनू शकली नाही. जोपर्यंत महिलांना समाजात समान दर्जा व वागणूक मिळत नाही . तो पर्यंत महिला सक्षम होणार नाही. असे मत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा व जि. प . माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी व्यक्त केले. त्या नागाव तालुका हातकणंगले येथे आंतरराष्ट्रीय बालिका सप्ताह व बेटी बचावो बेटी पढावो अभियान उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत ह होते .तर पंचायत समिती सदस्य डॉ. सौ. सोनाली पाटील व उपसरपंच सौ मनीषा पाथरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     महाडिक पुढे म्हणाल्या , बेटी बचावो बेटी पढावो हे अभियान केंद्र शासनाने एक सामाजिक चळवळ म्हणून पुढे आणली आहे. याची सुरुवात पानिपत या ऐतिहासिक ठिकाणाहून करण्यात आली होती. हे अभियान यशस्वी होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागामार्फत महिलासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.

     त्या पुढे म्हणाल्या भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. महिलांना देवता म्हणून दर्जा देण्यात आला पण तिला आबला असे संबोधून सबला होण्याच्या मार्गावर आहे. असे म्हणून दुय्यम स्थान दिले जात होते. पण केंद्र सरकारने महिलासाठी ५० % आरक्षण लागू केले आहे .त्यामुळे महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा तसा उमटवत आहेत. पण त्यांना समान दर्जा किंवा वागणूक मिळत नाही. ती पुरुष प्रधान देशाने दिली पाहिजे असे मत सौ. महाडिक यांनी व्यक्त केले .
   महिलांच्या वरील अत्याचाराबाबत बोलताना महाडिक म्हणाल्या गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात सुमारे ४८ घटना या महिलांच्या वरील अत्याचाराच्या आहेत . त्यामुळे सध्या महाराष्ट्रात बेटी बचावो बेटी पढाओ यापुरतेच हे अभियान न राहता महिलांच्या सुरक्षेबाबत ही शासनाने गांभीर्य घेतले पाहिजे असेही सौ. महाडिक यांनी सांगितले.
    यावेळी एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे . अशा महिलांचा विशेष सत्कार व भाग्यश्री ठेव पावतींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
     कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या सौ. शशिकला कोळी, भाजप महिला आघाडी सदस्या सौ. अश्विनी पाटील, सौ. मनिषा कुलकर्णी, सौ. सरिता माळी, सौ. गवळी, ग्रामविकास अधिकारी ए.डी.सिदनाळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!