जयसिंगपूर / प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायलायने मराठा आरक्षणास अतंरिम स्थागिती उठविण्यासाठी येथील मराठा समाज बांधवांच्यावतीने क्रांती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाचा विरोधात घोषणा देत टायरी पेटवून निषेध व्यक्त केला. यावेळी जयसिंगपूर शहर व परिसरातील मराठा समाजबांधवासह विविध पक्ष व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

येथील क्रांती चौकांतील राजर्षी शाहु महाराज यांच्या पुतळयासमोर सोमवारी सकाळी दहा वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे , नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ-जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता. यावेळी नगरसेवक सर्जेराव पवार, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर, कॉ. रघुनाथ देंशिगे आदिनी मनोगत व्यक्त करुन बहुजन समाज्याचे नेतृत्व करणार्या मराठा समाज्याला आरक्षण देण्यात यावे, मराठा समाज शांत आहे. त्यामुळे सरकारने आमच्या भावना दुखवू नये. अन्यथा रस्त्याच्या लढाईस देशभरातुन सुरवात होईल. असा इशारा दिला.
दरम्यान सांगली- कोल्हापूर महामार्गावरील क्रांती चौकात टायरी पेटवून शासनाचा निषेध केला. जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पेटविण्यात आलेल्या टायरी बाजूला करुन आंदोलकांना शांत केले. यावेळी नगरसेवक पराग पाटील, बजरंग खामकर, अभिजित भांदिगिरे, शंकर नाळे, भगवंत जांभळे, सागर मादनाईक, तेजस कुराडे, धनजंय मांगले, रणजित महाडिक, अशोक घोरपडे, रंगराव पवार, संजय चव्हाण, मुबिन मुल्ला यांच्यासह मराठा बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. तर कोणताही अनुचित प्रकार घडु नये . यासाठी पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.