रुई गावातील विकास कामांसाठी आणखी निधी देणार -सभापती डॉ. पद्माराणी पाटील

रुई / वार्ताहर
       हातकणंगले तालुक्यातील रूई येथील मंगलधाम परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी माजी खास . राजू शेट्टी यांच्या प्रयत्नातून पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यांचा शुभारंभ कोल्हापूर जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

         रुई गावांमध्ये सांस्कृतिक भवनासाठी व पर्यटन विकास आराखड्यातून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रयत्नातून १०८ बाहुबली महाराज सांस्कृतिक भवन मंगलधाम या ठिकाणी पाच लाख रुपयांचे पेव्हिंगब्लॉक बसविण्याचे आयोजित असून त्याचा शुभारंभ कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पार पडला. यावेळी दिगंबर जैन समाजाच्या वतीने सभापती सौ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी येणाऱ्या भविष्यकाळात रुई गावातील विकास कामांसाठी आणखी निधी देण्याचे आश्वासन दिले . त्याचबरोबर कोरोना रोगासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
       या कार्यक्रमाप्रसंगी जैन समाजचे चेअरमन राजकुमार कल्याणी , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेअध्यक्ष सुनिल वडगावे, माजी उपसरपंच सुभाष चौगुले, माजी ग्रा.प. सदस्य डॉ.सुधीर भोकरे, संजय आबदान, योगेश हेरवाडे, बी.बी.हुपरे सर , समेद चौगुले, प्रतीक धड्डे ,वीर सेवा दल सदस्य, वीर महिला मंडळाच्या सदस्या तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!