कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने दाखल झालेले प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्च व बनोथ मुघेंद्रलाल यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो. नि. तानाजी सावंत व सपोनि सत्यराज घुले यांनी धडक कारवाई करून तब्बल तीन लाखाचे नशिले पदार्थ व रोख रक्कम जप्त केली आहे. यामध्ये गांज्या , भांगेच्या गोळ्या , गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. कारवाईमध्ये संशयित आरोपी अभिजीत बळीराम पाटील ( रा. बोरवडे तिट्टा , मुरगूड ता. कागल ) व अनिल तावडे ( रा.सरवडे ता. राधानगर) यांच्याविरुद्ध मुरगुड पोलीसात गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास सपोनि विद्या जाधव करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की , संशयित आरोपी अभिजीत बळीराम पाटील ( रा. बोरवडे तिट्टा , मुरगूड ता. कागल ) व अनिल तावडे ( पुर्ण नाव समजु शकले नाही. रा.सरवडे ता. राधानगरी ) यांचा बेकायदेशीर नशाजन्य पदार्थ , गुटखा , व तंबाखुजन्य पदार्थ विकण्याचा किरकोळ व होलसेल प्रमाणात व्यवसाय असल्याची माहिती पोलिसांना समजली. माहितीच्या आधारे अभिजीत पाटील यांचे राहते घरी छापा टाकून रुपये 3,08,976/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये दीड किलो गांजा ,19 पुड्या भांग तसेच गुटखा पान मसालासह सुगंधी तंबाखूजन्य पदार्थाची पाच पोती सापडली . व रोख रक्कम रूपये-2,46,080/- जप्त करण्यात आली हा सर्व मुद्देमाल सरवडे (ता. राधानगरी ) येथील अनिल तावडे यांच्याकडून होलसेल दरात येऊन किरकोळ स्वरूपात अभिजीत पाटील विकत होता . या प्रकरणाचा मुरगुड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे . कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोहेकॉ अजित वाडेकर , महेश गवळी , अनमोल पवार , ओंकार परब , रणजीत पाटील व ड्रायव्हर सुकुमार हासुरकर यांचा समावेश आहे.