मराठा आरक्षण मागणीसाठी भुदरगड तालुक्यात आंदोलन ; प्रचंड घोषणाबाजीने क्रांती चौक दणाणला … तहसीलदारांना निवेदन सादर

गारगोटी / ता.१४ (प्रतिनिधी)
        मराठा समाजाला आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजात असंतोष पसरला असून त्याचे ठिकठिकाणी पडसाद उमटत आहेत. आज गारगोटी येथे भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करणेत आले . यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून क्रांती चौक दणाणून सोडला. मागणीचे निवेदन मराठा रणरागिणीकडून भुदरगड तहसीलदार यांना देणेत आले.

        भुदरगड मराठा आरक्षणासाठी घोषणा देतांना मराठा बांधव

     गारगोटी येथील क्रांती चौकात सकाळी मराठा बांधव हातात भगवे ध्वज घेऊन एकत्र आले . प्रारंभी सकल मराठा समाजाच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करणेत आला. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ३२ मराठा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणेत आली. यावेळी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करणेत आला. यावेळी “एक मराठा-लाख मराठा,” छत्रपती शिवाजी महाराज की जय ” च्या घोषणा देणेत आल्या. यावेळी अनेक वक्त्यांनी मराठा आरक्षणासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यासाठी स्वतंत्र अद्यादेश काढावा. अशा मागण्या केल्या. याबाबतचे निवेदन भुदरगड तहसीलदार यांना मराठा भगिनी कु. नम्रता कृष्णात गोरे व कु. ऋतुजा जयवंत गोरे यांचेकडून देणेत आले. यावेळी प्रा. आनंद चव्हाण यांनी स्वागत करून प्रास्ताविकात आरक्षणाची सद्यस्थिती सांगितली. सचिन भांदिगरे, मचिंद्र मुगडे यांची भाषणे झाली, यावेळी भुदरगड तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे, राहुल देसाई, प्राचार्य अर्जुन आबिटकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिह सावंत, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील, तालुका प्रमुख अविनाश शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, बाळासाहेब जाधव,भाजपाचे नाथाजी पाटील, रविंद्र कामत, तालुका संघाचे उपाध्यक्ष एम. डी . पाटील, गारगोटीचे माजी उपसरपंच सचिनबाबा देसाई, जयवंत गोरे, शेखर देसाई, अजित देसाई, दीपक देसाई, संग्राम सावंत, रणधीर शिंदे, प्रा. डॉ .उदय शिंदे, तुकाराम देसाई, संदीप पाटील,शशिकांत पाटील, संदीपराज देसाई,शैलेश गुंड, सतीश जाधव,पार्थ सावंत, चंद्रकांत देसाई, राजू चिले, अलकेश कांदळकर,यांचेसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुदरगड तहसीलदार यांना मराठा आरक्षणासाठी निवेदन देताना मराठा भगिनी, व प्रा अर्जुन आबिटकर, राहुल देसाई, विश्वनाथ कुंभार, शामराव देसाई,मचिंद्र मुगडे, प्रकाश पाटील आदी तर दुसऱ्या छायाचित्रात घोषणा देतांना मराठा बांधव

error: Content is protected !!