इचलकरंजी / प्रतिनिधी
रोटरीचे प्रांतपाल श्री. संग्राम पाटील यांचा 56 वा वाढदिवस वेगवेगळे चौदा समाजपयोगी उपक्रम राबवुन मोठ्या उत्साहात पार पडला. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या माध्यमातून एका दिवसात चौदा उपक्रमाच्या माध्यमातुन प्रत्येक उपक्रमातुन 56 परिवार याप्रमाणे एकूण 728 लाभार्थीना लाभ मिळाला.

यामध्ये श्रमिक पत्रकार संघ व प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या तेरा पत्रकारांचा विमा उतरविण्यात आला. घोसरवाड व कुंभोज येथील वृद्धाश्रमास ऑक्सी मिटर टेंपरेचर गन व ऑक्सिजनची मशीन वाटप केले. नगरपालिका बेघर वसाहत येथील 56 बेघर लोकांना पाच दिवसाचा काढा वाटप करण्यात आला. डीवायएसपी ऑफीस व ॲडिशनल ऑफिस चे पोलीस दलाला 56 मास्क वाटप करण्यात आले. नाना नानी पार्कमध्ये तीन बेंच प्रदान करण्यात आले . ANNETS क्लबच्या साथीने वृक्षारोपण व तांबे माळ येथील आरोग्य केंद्राला दोन सॅनिटायझर कॅन व 56 फेस मास्क वाटप करण्यात आले. न्यू मेंबर डेव्हलपमेंट अंतर्गत दोन नवीन मेंबरांचा आपल्यात समावेश करण्यात आला. प्रोबस क्लबला तेरा ऑक्सीजन मशीन्स डी एम कस्तुरे यांच्याकडे सुपूर्द केली . ANNS CLUB सोबत आशा वर्कर्सना रोटरी कॅप व बंद स्थितीत असलेल्या ऑक्सी मीटना 112 सेल देण्यात आले.
अब्दुललाट येथील बाल अनाथ आश्रमास महिन्याचे रेशन वाटप करण्यात आले. तसेच कुष्ठरोग वसाहतीतील 56 परिवारास स्वच्छता मोहीम अंतर्गत हॅन्ड वॉश, अंगाचे साबण ,कपड्याचे साबणाचे वाटप करण्यात आले. व
नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली . न्यू इंग्लिश मारवलस स्कूल ,इनरव्हील क्लब ने उपकृत केलेला वॉटर फिल्टरचे उद्घाटन व ANNS क्लबने घेतलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धेचा बक्षीस समारंभ सौ.उत्कर्षा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. रोटरी वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष रोटेरियन नेमिनाथ कोथळे यांचे हस्ते रोटरी परिवारासाठी आरक्षित ठेवलेला ऑक्सीजन मशीन प्रदान करण्यात आले.
याच कार्यक्रमात उपस्थित असलेले आपल्या क्लबचे डॉक्टर्स कोरोना महामारीच्या संकटात काम केले बद्दल रो.डॉ. तोष्णीवाल रो.डॉ.कलवडे , रो.डॉ.सौ कडतारे यांचा गौरव करण्यात आला. या सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने Rotarians ,Anns , Annets , आपले असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन भाऊसो नाईक ,असिस्टंट गवर्नर रोटेरियन नितीन शेट्टी, रोटरी सेंट्रलचे रो .नितीकुमार कस्तुरे रोटेरियन हस्मुख पटेल इनरव्हील क्लबच्या सौ. रेखा भंडारी ,तसेच जयसिंगपूर रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते . कार्यक्रमात पिडीजी रो. महेंद्रजी मुथा, ट्रस्टचे अध्यक्ष रो. नेमिनाथ कोथळे , व तिळवणी शाळेचे अध्यक्ष रो. डी.एम. कस्तुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय यळरुटे व सेक्रेटरी रो. दीपक निंगुडगेकर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला.
