गारगोटी /ता.१५ (प्रतिनिधी)
गारगोटीसह भुदरगड तालुक्यात ७४ वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करणेत आला, या निमित्ताने ठिकठिकाणी ध्वजारोहण करणेत आले.अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन साधेपणाने आणि सोशल डिस्टिंगशनचे पालन करून साजरा झाला.
भुदरगड तहसील कार्यालय आवारात तहसिलदार अमोल कदम यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले, यावेळी नायब तहसिलदार शिंदे, भुदरगडचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, उपनिरीक्षक अमित देशमुख यांचेसह तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

भुदरगड पंचायत समितीचे आवारात सभापती श्रीमती किर्ती देसाई यांचे हस्ते ध्वजारोहण झाले, यावेळी उपसभापती सुनील निंबाळकर, गटविकास अधिकारी अजित देसाई, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री मौनी विद्यापीठात दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य दिन साजरा होतो,पण यावेळी विद्यार्थ्यांविना स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागला, विद्यापीठाच्या विश्वस्त सौ, शालिनी देसाई यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले, यावेळी सदस्य मधुकर देसाई, नंदकुमार ढेंगे, प्रा. दीपक खोत, संचालक डॉ. आर.डी. बेलेकर यांचेसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते, दरवर्षी राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने सलामी आणि पथ संचलन केले जाते,पण यंदा शाळा, कॉलेज यांची प्रवेश प्रक्रिया बंद असलेने विद्यार्थीच नाहीत . त्यामुळे मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम झाला.
गारगोटी ग्रामपंचायत येथे सरपंच संदेश भोपळे यांचे हस्ते ध्वजारोहण झाले, यावेळी उपसरपंच सौ.स्नेहल कोटकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी पाटील, सर्व कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते