तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

वारणानगर / प्रतिनिधी

येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या २६ व्या स्मृति दिनानिमित्त प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. आण्‍णासो पाटील, प्रा. दिलीप घाडगे, प्रा. वैभव बुड्ढे, प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर, भालचंद्र शेटे यांनी अभिवादन केले. शिक्षण संकुल परिसरात मर्यादित लोकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या मध्यवर्ती स्मृती सोहळ्यास श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी सद्भावना ज्योतींचे स्वागत केले. यावेळी श्री वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपूणराव कोरे यांनी तात्यासाहेबांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. युवा नेते ज्योतिरादित्य कोरे, विश्वेश कोरे विविध संस्थांचे पदाधिकारी प्राचार्य उपस्थित होते.

error: Content is protected !!