स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर) यांनी केले ध्वजारोहण ;कोरोना योद्धाचा केला सत्कार

जयसिंगपूर/ता .१६ प्रतिनिधी

         जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .जयसिंगपूर नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर ) यांनी जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रांगणात, गांधी चौक व शहराच्या दसरा चौकातील राजर्षी शाहू स्टेडियमवर झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यामध्ये झेंडावंदन करीत असताना , कोरोनाच्या काळात जीवाची परवा न करता आघाडीवर राहून सेवा बजावलेल्या नगरपरिषदेच्या बांधकाम व स्वच्छता विभागाकडील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन झेंडावंदन केले . नगरपरिषद इमारतीसमोर झालेल्या झेंडावंदन समारंभामध्ये ध्वजारोहण करीत असताना प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर ) यांनी कोरोना काळात अतिशय जबाबदारीने आणि जोखमीचे काम केलेल्या बांधकाम विभागाकडील माणिक माने यांना सोबत घेऊन ध्वजारोहण केले .
           गांधी चौक येथील ध्वजारोहण स्वच्छता विभागाकडील हंगामी कर्मचारी प्रभाकर माने यांना सोबत घेवुन ध्वजारोहण करीत सन्मान दिला तर दसरा चौकातील राजर्षी शाहू स्टेडियमवरील मुख्य ध्वजारोहण रविंद्र कांबळे या स्वच्छता विभागाकडील कर्मचाऱ्यांसोबत ध्वजारोहण केले .
         स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिलेल्या सन्मानामुळे नगरपालिका प्रशासनामधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जयसिंगपूर शहरांमधील नागरिकांतुन त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे . आजच्या नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या काळात जयसिंगपूर शहरांमधील ज्ञात-अज्ञात, डॉक्टर्स, महसूल, आरोग्य, पोलीस दल, स्वच्छता विभाग, स्वयंसेवी संस्था,व्यक्ती या सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल या सर्व घटकांचा कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन नगरपरिषदेच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला,
         नगर परिषदेकडील स्वच्छता विभागाचे कर्मचारी, सफाई कामगार, झाडू कामगार या सर्वांना प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी कोरोणायोद्धा म्हणून सन्मान चिन्ह व भेटवस्तू देवुन सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.शासनाचे निर्देश पाळत अतिशय साध्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला .
          यावेळी मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासह जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. खटावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, अजित पाटील, श्री. वाघ शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी,
जयसिंगपूरनगरीचे माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, सदस्य ,सदस्या, यांच्यासह शहरांमधील सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक माजी सैनिक, शिक्षक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!