वारणानगर /ता. १६ शिवकुमार सोने
येथील श्री.वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित विविध शैक्षणिक संस्थांचा सामुदायिक मध्यवर्ती ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. प्रशासकीय अधिकारी डॉ.वासंती रासम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. देश स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या ज्ञात-अज्ञातांना अभिवादन करून कोरोना कालखंडामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर,सेवक,आशा वर्कर्स,सफाई कर्मचारी यांच्या कार्याला सलाम करून ध्वजारोहण संपन्न झाले. संयोजन यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाने केले.
यावेळी प्र.प्राचार्य प्रा.डॉ.प्रकाश चिकुर्डेकर, प्राचार्य एस. व्ही. आणेकर, प्राचार्य डॉ. जाॅन डिसोझा, प्रा. आण्णासो पाटील, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ. एस. एस. खोत, प्रा.जयंती गायकवाड, प्रा. बक्कस कुरणे, प्रा. संग्राम दळवी,यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.
