माजी आम. राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…..

कोल्हापुर / प्रतिनिधी
     हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे माजी. आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

    यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा मानसन्मान आम्ही ठेवू असा विश्वास दिला.
    मा. आम. राजीव आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगर परिषदेचे सदस्य श्री. अब्राहम आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्मिता आवळे, वडगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष लता सूर्यवंशी, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे डॉ. प्रफुल्ल असुरलेकर, डॅरल डिसुझा, मॅलेट परेरा, अनिल भोसले, भारतीय लहुजी पँथरचे प्रदेश संघटक युवराज दाखले यांचाही प्रवेश झाला. यावेळी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आदि मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!