ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा संपर्कप्रमुख दुधवडकर ; विधानसभेच्या निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्या पदाधिकाऱ्यांचा मा. आम. मिणचेकर यांच्याकडुन पंचनामा …..

वडगाव / प्रतिनिधी
    कोल्हापूर जिल्ह्यातील येवु घातलेल्या निवडणूकीत प्रत्येक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहाण्याचे आदेश शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी दिला. ते पेठ वडगाव येथे शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आयोजित मेळाव्यात बोलत होते.


      यावेळी मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर बोलताना म्हणाले की , गाव पातळीवर शक्य असेल त्या ठिकाणी स्वतंत्र अथवा स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवावी. शिवसेनेचे जास्तीत जास्त सदस्य व सरपंच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर शिवसेनेत राहून २०१९ च्या विधानसभेवेळी ठराविक शिवसैनिकांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात उघड प्रचार केला.
शिवसेनेत कट्टर शिवसैनिकाला सांगावं लागतं नाही की कोणाला मतदान करावे, दगड जरी उभा केला तरी त्याला मतदान करतात असे आम्ही पूर्वी म्हणायचो .पण दुर्दैवानं काही ठराविक शिवसैनिकांनी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा त्यांच्या स्टेजवरून प्रचार केला.


     शिवसेनेच्या पदाचा गैर उपयोग केला . तसेच हकालपट्टी केलेल्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घ्यायचच असेल तर स्थानिक खासदार व आमदारांना व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन बैठक करावी . पक्षप्रवेश करणाऱ्यांकडून पक्षाशी प्रामाणिक राहण्याबाबत आश्वासन घेण्यात यावे. यावेळी संपर्क प्रमुख दुधवडकर डॉ. मिणचेकर यांच्या बोलण्यास अनुमोदन दिले. म्हणजे किमान पुन्हा असे गैरप्रकार होणार नाही.असे मत व्यक्त केले


     यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर , खासदार धैर्यशील माने , मा.आमदार सत्यजित पाटील , जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव , जिल्हा महिला प्रमुख सौ मंगलताई चव्हाण , सौ शिंत्रे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील , नामदेव गिरी , साताप्पा भवान , आनंद भेडसे , मनिष धामापुरकर , आरोग्य सभापती हंबीरराव पाटील , शिक्षण सभापती प्रविण यादव , समाज कल्याण सभापती सौ स्वातीताई सासणे , पंचायत समिती सभापती सौ कविता चौगुले , तालुका प्रमुख सतीश मलमे , बाजीराव पाटील , बाबा पाटील , महेश चव्हाण , दीपक यादव , सयाजी चव्हाण , रवींद्र माने सर्व महिला तालुकाप्रमुख, युवासेना युवा अधिकारी , उपतालुका विभाग प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.   

error: Content is protected !!