हातकणंगले / प्रतिनिधी
शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात शिक्षकांनी सेवा बजावत असताना स्व:ताचा संसार सुखी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कायमस्वरूपी टिकविण्यासाठी प्रयत्न करावे . असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे जेष्ठ सदस्य अरुणराव इंगवले यांनी केले. हातकणंगले येथील श्री रामराव इंगवले (Ingwale high school) हायस्कूलच्या सन१९७७- ७८च्या दहावी बॅचने तब्बल बेचाळीस वर्षानंतर आयोजित केलेल्या (Get Together) “स्नेहमेळाव्या”च्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मानसिंगराव इंगवले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या पुजन व दिपप्रज्वलन करून झाली. यावेळी सन १९७७- ७८च्या दहावी बॅचकडून सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे मुलींसाठी अद्यावत प्रसाधन गृह बांधून देण्याची ग्वाही देवुन शाळे विषयक आपली बांधिलकी जपली.
यावेळी सदर बॅचचे माजी विद्यार्थी निवृत पोलीस उपाधिक्षक विष्णू पवार, डॉ.विजय वडेर, अॅड.राजेंद्र पाटील(आळतेकर), कृषी अधिकारी संजय वाघमोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत शाखा अभियंता महादेव गाताडे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत आपण जीवनात कसे यशस्वी झालो. तसेच उच्च पदापर्यंत कसे पोहोचलो हे सांगितले. यावेळी तत्कालीन शिकवण्यास असणारे निवृत्त शिक्षक एस.आर.कुलकर्णी, निवृत शिक्षिका अलका जाधव, माजी मुख्याध्यापक दादासाहेब लाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या माजी विद्यार्थीनी व विद्यमान मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांनी केले. आभार अमर इंगवले यांनी मानले.
कार्यक्रमास आनंदराव इंगवले, संस्था उपाध्यक्ष प्रकाशराव इंगवले,सचीव उदयराव इंगवले, डॉ.रविंद्र कदम, नगरसेवक राजू इंगवले, प्रसाद पाटील, अजित कोळाज, अनिल चव्हाण, संभाजी तेली, विजय कदम यांच्यासह पंचेचाळीस माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी, निवृत शिक्षक-शिक्षिका,व आजी -माजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
१९७७-७८ची बॅच म्हणजे ‘आदर्श’ बॅच… सदर बॅचचे विद्यार्थी म्हणजे खूप कष्टाळू व अभ्यासू आपआपल्या नोकरी, व्यवसायात व शेतीमध्ये वेगळा ठसा उमठविला आहे.यामध्ये पोलीस उपाधिक्षक, अभियंता, डॉक्टर, वकील व व्यावसायिक आदिचा समावेश आहे.
