आभाळमाया संस्थेकडून समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात मिळणार -डॉ. रूपा शहा

हेरले / प्रतिनिधी
         प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपावलीच्या सणाच्या पहिल्याच दिवशी मानवतेच्या भावनेतून मातोश्री या वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांना साडी व पुरुषांना शाल देऊन मायेची ऊब देणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षिका, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा व प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालिका लक्ष्मी पाटील यांचे कार्य हे निश्चितच प्रेरणादायी असून कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन डॉ. रूपा शहा यांनी केले.

येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे आयोजित आभाळमाया संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. रूपा शहा सोबत वैशाली राजशेखर ,विश्वास सुतार, लक्ष्मी पाटील ,सुनील पाटील व अन्य मान्यवर …

   सामाजिक, शैक्षणिक व मानवतेच्या भावनेतून स्थापन केलेल्या ‘आभाळमाया ‘ या संस्थेच्या कार्याची सुरुवातच वृद्धाश्रमामधील वृद्धांना मायेची ऊब देत करण्यात आली. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर होत्या.
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे समाजभान समुहाचे प्रमुख विश्वास सुतार म्हणाले, लक्ष्मी पाटील आपले शैक्षणिक कार्य सांभाळत सामाजिक बांधिलकी सतत जपत असतात.आभाळमाया या संस्थेच्या माध्यमातून त्या समाजासाठी भरपूर सामाजिक कार्य करतील याची खात्री आहे.
    आभाळमाया संस्थेच्या संस्थापिका लक्ष्मी पाटील म्हणाल्या ,आभाळमाया या संस्थेच्या माध्यमातून समाजातील निराधार, अनाथ,वंचित ,गरीब व गरजूंच्या जीवनातील अंधार आपल्या कुवतीप्रमाणे नाहीसा करण्यासाठी जास्तीत जास्त मदत करण्याचा सतत प्रयत्न राहील.
   कार्यक्रमास वृद्धाश्रमाच्या उपाध्यक्षा सूर्यप्रभा चिटणीस, नेते रघुनाथ खोत, शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस सुनिल पाटील, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब सकट ,करवीर अध्यक्ष रावसाहेब पाटील, सरचिटणीस प्रकाश सोहनी, मनोज माळवदकर,राजेश वाघमारे, शरद पाटील, तुषार पाटील, प्रहारचे अध्यक्ष विष्णू मोहिते, नूतन सकट ,छाया पानारी,रेखा पाटील ,उषा नंदगावकर ,बाजीराव पाटील
आदी उपस्थित होते.
    स्वागत मारुती पाटील व प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले, आभार संस्थेच्या उपाध्यक्षा सविता पाटील यांनी मानले व सुत्रसंचलन स्वाती खाडे यांनी केल

error: Content is protected !!