शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शिरोळ शाखेच्यावतीने दिवाळीनिमित्त गरीब व गरजू दिव्यांग बांधवांना घरोघरी दिवाळीचे पदार्थ व भेट वस्तुंचे वाटप करून दिव्यांग बंधू -भगिनींच्या परिवारांना शुभेच्छा देण्यात आल्या.

शिरोळ व परिसरातील इतरांप्रमाणे दिव्यांग परिवारामध्ये दिवाळी सणाचा उत्साह ,आनंद निर्माण झाला पाहिजे. तसेच फराळाचे गोड पदार्थ व अन्य साहित्य त्यांना देण्याबाबत प्रहार अपंग दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार शिरोळ शहरातील सुमारे 18 दिव्यांग परिवारांना दिवाळी पदार्थाचे साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने म्हणाले, दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद द्यायचे काम प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने केले असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्याची दीपावली दिव्यांग बांधवांसाठी गोड साजरी झाली पाहिजे, ही भूमिका घेऊन राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबत त्यांनी कौतुक केले.
साहित्य वाटप कार्यक्रमास प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष किसन चौगुले, उपाध्यक्ष अनिल देशमुख , गजानन जगदाळे , विनायक चुडूमुंगे, विजय परीट ,किसन काळे , बजरंग पवार , ओंकार देशमुख यांच्यासह प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माने, राजेंद्र प्रधान , उदय शिरोळकर उपस्थित होते.
