उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई / अष्ट्याहत्तर हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त

इचलकरंजी / प्रतिनिधी

   राज्य उत्पादन शुल्क विभागाने जवाहरनगर , (इचलकरंजी) व निमशिरगाव (ता . शिरोळ ) येथे छापा टाकून गोवा बनावटीची 78 हजार 700 रुपयेचा दारूसाठा जप्त केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. प्रवीण जिवबा मांगले (रा.तिरंगा कॉलनी , कबनूर ) व महेश अशोक कोगले (रा. निमशिरगाव ता. शिरोळ ) अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई कोल्हापूर विभागाचे राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त वाय.एम. पवार अधीक्षक श्रीमती संध्याराणी देशमुख , उपअधीक्षक बी. आर . चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी . आर . पाटील , दुय्यम निरीक्षक राहुल गुरव , श्रीमती वर्षा पाटील , सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी.एस. हजारे , जवान सुभाष कोले , विलास पवार , विजय माने , विशाल आळतेकर , प्रसन्नजीत कांबळे यांनी केली.
  अधिक माहिती अशी की इचलकरंजी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागास गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जवाहरनगर (इचलकरंजी) व निमशिरगाव ( ता. शिरोळ ) येथे कारवाई केली . कारवाईत गोवा बनावटीच्या 82 बाटल्या जप्त केल्या असून त्याची किंमत 78,700/- रुपये आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन चाकी मोपेड ताब्यात घेतली आहे.

श्री. पी. आर. पाटील
उत्पादन शुल्क निरीक्षक इचलकरंजी शहरात अशाप्रकारे कोणत्याही ठिकाणी अवैद्य मद्यनिर्मिती , साठा , विक्री अथवा वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मोहीम जोमाने राबविणार आहे.

error: Content is protected !!