वारणानगर : प्रतिनिधी
तळसंदे (ता.हातकणंगले) येथील डाॅ डी वाय पाटील कृषी,अभियांत्रिकी व तंञज्ञान महाविद्यालयमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे ‘इंजिनिअर्स डे’ च्या निमित्ताने “सेल्फ रीलाइन्ट इंडिया” या विषयावरती पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.पाटील व अकॅडमीक इन्चार्ज यांच्या हस्ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.स्वागत व प्रास्ताविक प्रा.के.आर.पवार यांनी केले.

डॉ.जे.एस.घाटगे यांनी ‘इंजिनिअर्स डे’ संदर्भातील चित्रफितीचे ऑनलाइन सादरीकरण केले.प्राचार्य डॉ.एस.बी.पाटील यांनी कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यास कृषी अभियंत्यांचे योगदान किती महत्वाचे आहे. या विषयावरती उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटेशन स्पर्धेचे कार्यक्रम प्रतिनिधी, इंजि.वाय.व्ही.चिमटे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धेबाबतच्या नियम व अटी यासंदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात स्पर्धेमध्ये सहभागी असणारे एकूण १८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सादरीकरण झाले.इंजि.के.आर. पोवार, डॉ.आर.व्ही.पवार आणि इंजि.एम.बी.खेडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
दरम्यान महाविद्यालयाचे १८ प्राध्यापक तसेच १८५ विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.’सेल्फ रिलाइन्ट इंडिया ‘या पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटेशन मध्ये धनश्री धर्मेंद्र पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकवला, समृद्धी राहुल इंग्रोळे व नेहा दिलीप पाटील यांनी विभागुन द्वितीय क्रमांक पटकावला . तर अनुराधा बाळासो बाचणकर व प्रणव मोहन पवार हे विभागुन तृत्तीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपञे प्रदान करण्यात आली.अकॅडमिक इन्चार्ज इंजि.पी. डी.उके यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील व संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.ए. के.गुप्ता यांचे प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमासाठी इंजि.पी.आर. साबळे,इंजि.एस.आर.मुंदाळे, इंजि. वाय. व्ही. चिमटे, डॉ. जे. एस.घाटगे,इंजि.के.आर.पोवार,डॉ.आर.व्ही. पवार, इंजि. एस. डी.भोसले यांनी परिश्रम घेतले.