हातकणंगले / प्रतिनिधी
सध्याच्या कोरोना महामारीमध्ये होमिओपॅथी औषधांचा वापर हा प्रत्येक कोवीड सेंटर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील कोरोना बाधित रुग्णांवर होणे गरजेचे आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतील. त्यामुळे मृत्युदर सुद्धा निश्चितच कमी होईल. असा विश्वास होमिओपॅथी तज्ञ डॉ. मोहन गुणे यांनी व्यक्त केला. ते माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर यांनी घोडावत कोवीड सेंटर येथे आयोजित केलेल्या ”होमिओपॅथी उपचार व महत्व ” या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते.

डॉ. गुणे यांनी सांगितले , कोरोना रुग्णांची वेगवेगळी लक्षणे पाहून होमिओपॅथी औषधाचा उपचार करावेत. तसेच होमिओपॅथीचा वापर सुरु असताना अॅलोपॅथी औषधे वापरण्यास काही हरकत नाही. यावेळी डॉ. गुणे यांनी रुग्णांची लक्षणे व त्यावर बेसिक उपचार पद्धती मुद्देसूदपणे समजावून सांगितली.
संयोजक माजी आम. डॉ. मिणचेकर यांनी सांगितले , कोरोना कशामुळे वाढतोय याची कारणमीमांसा पाहूनच उपचार होणे गरजेचे आहे . स्वॅब घेतलेल्या रुग्णाचा रिपोर्ट येण्याअगोदरच त्याची लक्षणे पाहून होमिओपॅथी उपचार सुरू केल्यास रोगावर लवकर नियंत्रण येईल. होमिओपॅथी उपचारामुळे अनेक रुग्ण पूर्ण मुक्त झालेले आहेत .

यावेळी डॉ. शीतल पाटील डॉ.अन्वर गंजली यांनी मार्गदर्शन केले चर्चासत्रास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे डॉ. उत्तम मदने डॉ. चेतन जोशी डॉ. अमोल चौगुले डॉ. महादेव गावडे डॉ. विलास देशमुख , संजय चौगुले , हेरलेचे उपसरपंच विजय भोसले ,हातकणंगले तालुक्यातील सर्व सेंटरमधील डॉक्टर तसेच तालुक्यातील होमिओपॅथी डॉक्टर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.