कृष्णा घाटावरील मार्कंडेश्वर मंदिराचा जीर्णोधार सोहळा आयोजन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती… नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम

जयसिंगपूर / प्रतिनिधी
     श्री . प्रभु रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या अर्जुनवाड -मिरज कुष्णाघाटावरील श्री . मार्कंडेश्वर मंदिरांचा जीर्णोध्दार आणि श्रीमदभागवत गीता पारायण सोहळा 1 ते 8 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या कार्यक्रामांस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार असुन यावेळी देशातील जवानासाठी 11 हजार रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात येणार अाहे. तसेच पंतप्रधान मोदी यांची रक्ततुला करण्यात येणार असल्याची माहिती, सुर्यपीठ मुरलीमंदिर जुन्या आखाडयाचे पिठाधीरश्वर जगतगुरु सुर्याचार्य कृष्णदेवनंद आनंदगिरी महाराज यांनी दिली.

       येथील छत्रपती शिवाजी महाराज रोटरी भवन येथे मंगळवारी दुपारी पत्रकार बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. पुढे म्हणाले, अर्जुनवाड-मिरज येथे असणार्‍या कृष्णाघाटावरील मार्कंडेश्वर ऋषीनी 400 वर्षापुर्वी या मंदिराची स्थापना केली होती. मंदिराचा जीर्णोध्दाराचे व्रत घेतले आहे. यानिमित्ताने 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रामाचे आयोजनही करण्यात आले आहे. या सोहळयाला मिनिकुंभमेळा असे नामाकंन करण्यात आले असून, देशभरातील सुमारे 1 हजार साधु व संताच्या बरोबर लाखोंच्या संख्येने भाविक येतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
     या धार्मिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीसाठी सीबीआय यांच्याकडुन पाहणी करण्यात आली आहे. तर मोदी यांच्या हस्ते कृष्णामाईचे पुजन, अभिषेक, स्नान, पुजाविधी करण्यात येणार आहे. तरी मंदिर जीर्णोध्दार व सामाजिक उपक्रमातुन रक्तदान शिबिर यामध्ये या परीसरातील भाविकांनी सहभागी होण्याचे अहवान त्यांनी केले.
  बैठकीचे स्वागत शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश मलमे यांनी केले. तर प्रास्ताविक भाजपाचे मंडळ अध्यक्ष रमेश यळगुडकर यांनी केले. यावेळी मिलिंद भिंडे, संभाजीपूरच्या ग्रामपंचायत सदस्या मनिषा पवार, शहरप्रमुख अर्चना भोजणे, रंजना चौगुले, सुरज भोसले, अरुण लाटवडे, अरुण होगले, मनोज मलमे, आकाश शिंगाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!