
कोल्हापूर /ता.१६ (प्रतिनिधी)
सध्या वेळेची बचत करण्यासाठी कोणत्याही ऑनलाइन आमिषाला बळी पडू नका. वैयक्तिक माहिती अथवा ओटीपी पासवर्ड सांगू नका. तसेच अशा अनेक प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी जागृत राहून फक्त पूर्ण माहिती असलेल्या व ओळखीच्या व्यक्तीशी व्यवहार करावा. असे आवाहन कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले आहे.
पोलीस निरीक्षक मोरे यांनी , मोबाईल मधील कोणतेही परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय वापरू नये. असे सांगुन आमिषाला बळी पडून अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. त्यामुळे आपला बँक बॅलन्स ट्रान्सफर होऊ शकतो. डेबिट व क्रेडिट कार्डची माहिती शेअर करू नका. बनावट आयडी कार्डचा वापर करून व खोटी बतावणी करणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा. वस्तू समक्ष पाहूनच खरेदी करा. फुकटच्या गिफ्टसाठी एक्साईज ड्युटी भरा. असे सांगणाऱ्याला आधार कार्ड व पॅन कार्डची झेरॉक्स पाठवू नका. व्हाटस्अपवर आलेल्या मेसेजवर फोटो आयडेंटीवर अवलंबून राहू नका. असे सांगून ऑनलाइन फसवणूक झालेस तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे कळविले आहे.