वारणानगर प्रतिनिधी / शिवकुमार सोनी
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना स्वयंसेविकांच्या वतीने एक हजार हून अधिक लोकांना इम्मुनिटी बूस्टर डोसचे वितरण करण्यात आले. कणेरी मठ येथील पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या वतीने मोफत वितरीत करण्यात आलेल्या या इम्युनिटी बूस्टर डोसचे वितरण शुभारंभ प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते छात्र सेनेच्या स्वयंसेविकांना एक लिटर पाण्यामध्ये बारा थेंब औषधी देऊन करण्यात आले.

समाजात कोविड-19 जनजागृती मोहीम अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती वाढ होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचून, महत्त्व पटवून देऊन वितरण करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विभागप्रमुख प्रा.सौ. जयंती गायकवाड, प्रा. श्री. शरदचंद्र वळगाड्डे यांनी उपक्रमाचे संयोजन केले.