16 सप्टेंबर दिनविशेष

१९०८: जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.

१९३५: इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.

१९४५: दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.

१९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.

१९८७: ओझोनच्या थराच्या कमीत कमी संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.

१९९७: आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा १०० मीटर धावण्याचा १०.५० सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम.

१८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म.

१९०७: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म.

१९१३: रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म.

१९२३: सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यी यांचा जन्म

१९४२: निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी ना. धों महानोर यांचा जन्म.

१९५४: सतारवादक संजय बंदोपाध्याय यांचा जन्म.

१९३२: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचे निधन.

१९७३: पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन.

१९७७: हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे निधन.

१९९४: साहित्यिक, नाटककार व पत्रकार जयवंत दळवी यांचे निधन.

२००५: लेसर चे शोधक गॉर्डन गूल्ड यांचे निधन.

error: Content is protected !!