पट्टणकोडोली येथे 162 रक्तदात्यांनी केले रक्तदान

पट्टणकोडोली /ता.२७- साईनाथ आवटे

  पट्टणकोडोली (ता. हातकणगंले ) येथे हुपरी पोलिस स्टेशनच्या महारक्तदान शिबिराच्या  आवाहनाला प्रतिसाद देत 162 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

सध्या संपूर्ण जगभर कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाने  थैमान घातले आहे. या कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासू नये . यासाठी गणेश उत्सव  मंडळानी इतरत्र अवाजवी खर्च न करता गणेश उत्सव साध्या  पद्धतीने साजरा करून रक्तदान शिबिर आयोजित करून 1000 बाटली रक्त हुपरी परिसरातून जमा करावे . असे आव्हान हुपरी पोलिस स्टेशनचे पी. आय.राजेंद्र मस्के यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत काल हुपरी येथे 400 जणांनी रक्तदान केले तर आज पट्टणकोडोली येथे पहिल्याच दिवशी 162 जनांनी रक्तदान केले. कार्यक्रमासाठी हुपरी पोलिस स्टेशनचे पी आय राजेंद्र मस्के, बाळूमामा देवस्थान आदमापूर प्रमुख मानकरी कृष्णात वाघापूरे,उपसरपंच कृष्णाजी मसुरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष मच्छींद्र जाधव ,राणोजी पुजारी, अनिल कांबळे, मुबारक शेख, अनिल बिरांजे, प्रशांत निकम,मोहन वर्धन , हुपरी पोलिस स्टेशनचे निवृत्ती माळी, दिपक कांबळे,  दिपक सुतार इत्यादि मान्यवर मंडळी हजर होते. रक्तदान शिबिराचे आयोजन शंभूराजे प्रतिष्ठानच्या  मावळ्यानी करून यशस्वी पार पाडले.

error: Content is protected !!