दोन अपक्ष महिला नगरसेविकांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

हातकणंगले / प्रतिनिधी

        वर्षभरापूर्वी नव्याने स्थापन झालेल्या हातकणंगले नगरपंचायत मध्ये शिवसेनेने घवघवीत यश संपादन करून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. निवडणुकीत दोन प्रभागांमध्ये नगरसेविका सौ. रोहिणी खोत व नगरसेविका सौ. छाया पाटील या दोन महिला अपक्ष निवडून आल्या होत्या . दोन्ही महिला नगरसेविकेनी शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर , शिवसेना खासदार धैर्यशील माने व शिवसेना मा. आम . डॉ. सुजित मिणचेकर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मा.आमदार सत्यजित पाटील जिल्हा महिला प्रमुख मंगलताई चव्हाण , हातकणंगलेचे काका पाटील , उपनगराध्यक्ष रणजीत धनगर शिवसेना शाखाप्रमुख व नगरसेवक धोंडीराम कोरवी , दीपक वाडकर , अरुण कदम प्रसाद पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!