हातकणंगले / प्रतिनिधी

हेरले ( ता. हातकणंगले ) येथील ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने गावातील दिव्यांगांना एम. एस. ई. डी. किट,कर्णबधिर लोकांना कानातील मशीन,अपंग लोकांना काठी व कुबड्या,अंध लोकांना लेजर स्टिक आदी वस्तू महिला व बाल कल्याण सभापती डॉ. पद्माराणी राजेश पाटील व पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच राहुल शेटे, ग्रा. पं. सदस्य मज्जीद लोखंडे, बटुवेल कदम, दादासो कोळेकर, विजया घेवारी, अपर्णा भोसले, स्वरूपा पाटील ग्रामसेवक संतोष चव्हाण सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.