प्रदुषण विरहित दिवाळी विषयावर वालावलकर हायस्कूलमध्ये वेबीनार

कोल्हापूर /प्रतिनिधी
    येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये ‘प्रदूषण विरहित दिवाळी’ या विषयावर वेबिनार सादर करण्यात आले. व्याख्याते संजय सौंदलगे यांनी प्रदूषण कारणे आणि जबाबदारी सांगून यासाठी प्रत्येकाची जबाबदारी विषद केली.आनंदोत्सव साजरा करताना अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, बालकामगार यांचेही भान ठेवले पाहिजे असे सांगताना प्रत्येकाच्या जीवनातील अंधार नष्ट होण्यासाठी प्रयत्नशील राहावयास हवे असे आवाहन केले. तंत्रस्नेही शिक्षक सदाशिव ऱ्हाटवळ यांनी प्रास्ताविक केले तर संयोजक आणि हरितसेना विभाग प्रमुख दिनकर शिंत्रे यांनी आभार मानले .

   या विभागामार्फत आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला .मुख्याध्यापक महावीर मुदबिद्रीकर,उपमुख्याध्यापक बी. ए. लाड यांनी गुणवंत आणि पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले.वेबिनार मध्ये एकशे दोन विद्यार्थ्यांचा सहभाग होता .प्रथम क्रमांक प्राप्त कु.सिद्धी नरेंद्र चौगुले (लहानगट) आणि सलोनी शरद प्रभुदेसाई (मोठागट) यांनी ऑनलाईन मनोगत व्यक्त केले.

error: Content is protected !!