हातकणंगले / प्रतिनिधी
आळते ( ता. हातकणंगले ) येथे कल्याण मटका घेताना हातकणंगले पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले असुन संशयित आरोपीचे नांव गजानन पुंडलिक काकडे ( वय वर्ष- 33 )असे आहे . काकडे याच्याकडून 3100/-रू.चा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई नुतन जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी पदभार स्विकारल्यामुळे केली असल्याचे बोलले जात आहे.
आळते येथे आण्णासाहेब चौगुले अर्बन बँकेच्या शेजारी सायकल दुरुस्तीचे दुकान आहे . त्या दुकानात मटका घेत असल्याचे माहीती मिळाल्यानंतर कारवाई केल्याची पोलीसांकडून सांगण्यात आले . मटका घेणाऱ्या संशयित काकडे याला हातकणंगले पोलीसांनी अटक करून त्याच्या विरूद्ध गुन्हा नोंद केला आहे . ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक भवड यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग पाटील , महादेव माने , अतुल निकम , राकेश इंदुलकर , प्रकाश लाड , प्रकाश कवडे यांनी केली आहे. पुढील तपास सहा. फौजदार एम्.बी. कोळी करीत आहेत.