उजळाईवाडीत बालिका सप्ताह उत्साहात संपन्न ; बेबी किट , ठेव पावतीचे वितरण

उचगाव /प्रतिनिधी
     उजळाईवाडी ( ता. करवीर ) येथे आंतरराष्ट्रीय बालिका सप्ताहनिमित्त मुलींचे स्वागत व बेबी किट वाटप, दोन मुलीवर ऑपरेशन केलेल्या पालकांना ठेव पावती देण्यात आली.

उजळाईवाडी येथे बालिका सप्ताह निमित्य बेबी किट्स वाटप प्रसंगी सरपंच सौ.सुवर्णा माने, ग्रामविकास अधिकारी बी डी कापसे,पर्यवेक्षिका सौ.जयश्री कांबळे,मा. निदेशक मोहन सातपुते आदी.

     या अभियान प्रसंगी  वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले.प्रतिज्ञा घेण्यात आली. वृक्षारोपण करण्यात आले.१७ स्तनदा मातांना बेबी किट वाटप करण्यात आले. एका लाभार्थ्याला ठेव पावती देण्यात आली. तीन नवागत मुलींचे स्वागत करण्यात आले. रांगोळी स्पर्धेतील किशोरी मुलींना बक्षीस वाटप करण्यात आले.
   याकामी उपमुख्यकार्यकारी अधिकारी  सोमनाथ रसाळ ,बालविकास प्रकल्प अधिकारी  ज्योती पाटील , पर्यवेक्षिका जी.आर. कांबळे  यांचे सहकार्य व मागर्दशन  लाभले.
    कार्यक्रमास उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुवर्णा माने,  ग्रामविकास अधिकारी बी. डी. कापसे , आरोग्य सेविका  सौ.आर बी लाड , मा.निदेशक मोहन सातपुते, आशा सेविका, अंगणवाडी सेविका सुनिता सातपुते संगीता कोकाटे ज्योती खामकर ,प्रतिभा कांबळे, मदतनीस विमल डवरी, कमल सुतार, लता भोसले ,सरीता गिरी, पालक ,बालक उपस्थित होते.       

error: Content is protected !!