वडगांव / प्रतिनिधी
वडगाव येथे दरवर्षीप्रमाणे ब्राह्मण समाज संघामार्फत शारदीय ज्ञानसत्र व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे . यंदा व्याख्यानमालेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे व्याख्यान प्रथमच घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ऐकावयास मिळणार आहे. व्याख्यानासाठी गुगल मीट लिंकचा (google meet ) हे app डाउनलोड करून लाभ घेण्याचे आवाहन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष राजेश देवस्थळी उपाध्यक्ष अमोल चरणकर यांनी केले आहे.
व्याख्यानाची वेळ सायंकाळी सात ते आठ अशी असून https://meet.google.com/umn-mppj-enz या लिंकसाठी आपल्या मोबाईल मध्ये हे अॅप डाऊनलोड करून घ्यावे . व्याख्यानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यवाह वासुदेव अंबपकर , सहकार्यवाह अभिजीत चरणकर , दत्तात्रय सपाटे , प्रा. वसंतराव जोशी , अजित पराडकर , अॅड. विवेक कमलाकर , अतुल देशपांडे , डॉ . सचिन जोशी , सुरेश देवस्थळी , नंदु कुलकर्णी , सुहास आळतेकर यांच्यासह ब्राह्मण समाज संघाचे बांधव प्रयत्नशील असतात.
व्याख्याते व विषय पुढीलप्रमाणे
१) शनिवार 17 ऑक्टोंबर – कौशिक पाध्ये (आम्ही पुत्र अमृताचे )
२ ) रविवार 18 ऑक्टोंबर – श्री प्रसाद मारुलकर (विवेकानंदांची यशोसूत्रे )
३ )सोमवार 19 ऑक्टोंबर – श्री अभय देवरे (सकळा आवडे विनोद )
४ )मंगळवार 20 ऑक्टोंबर – वैद्य सुविनय दामले (कोरोनाची भिती कशी दूर कराल )
५ ) बुधवार 21 ऑक्टोंबर – स्वामीराज भिसे (संत साहित्य )
६ ) गुरुवार 22 ऑक्टोंबर – डॉ . प्रसाद सनगर (योग सर्वांसाठी )
७ ) शुक्रवार 23 ऑक्टोंबर – श्री सचिन मोरे (प्रज्वलित मनासाठी विचारांच्या मशाली )
८ )शनिवार 24 ऑक्टोंबर -श्री वासुदेव जोशी (किर्तन )
