महेश गुरव याची एनडीएमध्ये निवड ; प्रेरणा ॲकॅडमीच्या यशात मानाचा तुरा …..

इचलकरंजी /प्रतिनिधी
इचलकरंजी येथील प्रेरणा अॅकॅडमीचा विद्यार्थी महेश यशवंत गुरव यांची नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीच्या (NDA)स्पर्धा परीक्षेमध्ये निवड झाली . त्याला अॅकॅडमीचे संस्थापक प्रा. श्री.यु.एस. तांबे (सर ), यांच्यासह ॲकॅडमीचे अनुभवी प्राध्यापक वर्ग श्री.जाधव ( सर ), सौ.तेलनाडे ( मॅडम ), श्री. डांगे ( सर ), श्री. नदाफ( सर ), श्री.गायकवाड ( सर )श्री. कुंभार ( सर ) , श्री. माने ( सर ) यांच्यासह आई , वडीलांचे व घरच्यांचे मार्गदर्शन लाभले. त्याची कर्नाटक राज्यातील धारवाड येथील एसडीएम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या केंद्रावर परीक्षा झाली होती.

प्रेरणा ॲकॅडमीमधून आज अखेर बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन केले आहे . एकोणीस वर्षांपासून पाचवी ते दहावीपर्यंतचे क्लासेस सुरू असून त्यांचा दहावीचा निकाल दरवर्षी शंभर टक्के असतो. मागील दोन वर्षापासून त्यांनी अकरावी व बारावी सायन्सचे ॲकॅडमी सुरू केली असून JEE, NEET, CET या सर्व परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते.ॲकॅडमीमधील प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासह सदैव मार्गदर्शन असल्याने जास्तीजास्त पालक आपल्या पाल्याचा प्रवेश प्रेरणा ॲकॅडमीमध्ये नांव नोंदवत असतात.

error: Content is protected !!