माझे कुटूंब – माझी जबाबदारी अभियानास सहकार्य करा – मंदाताई धुमाळे ; कापूसखेडमध्ये आरोग्य तपासणीस प्रांरभ

इस्लामपूर / प्रतिनिधी
  कापूसखेड (ता.वाळवा ) येथे शासनाच्या ‘माझे कुटूंब – माझी जबाबदारी ’ उपक्रमांतर्गत कुटूंबातील प्रत्येकाची तपासणी करण्यात येत आहे. कुटूंबप्रमुखाने आपल्या घरातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सरपंच मंदाताई धुमाळे यांनी केले.

कापूसखेड : ‘माझे कुटूंब – माझी जबाबदारी या अभियानाचा शुभारंभ करताना सरपंच मंदाताई धुमाळे, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, संपतराव पाटील, बाबासाहेब पाटील, डॉ. प्रियंका सुर्यवंशी, जयश्री जगताप व अन्य.

  कापूसखेड ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड १९ नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘माझे कुटूंब – माझी जबाबदारी’ कोविडमुक्त महाराष्ट्र योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील प्रत्येक कुटूंबातील सदस्यांचे तापमान, आॅक्सिजन अणि कोमॉर्बिड रूग्ण आहेत काय याची माहिती घेतली जाणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळावे म्हणून राज्य शासनाने माझे कुटूंब माझी जबाबदारी ही महत्वकांक्षी मोहिम सुरू केली आहे.
  यावेळी बाजार समितीचे संचालक संपतराव पाटील,माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब पाटील, डॉ. प्रियंका सुर्यवंशी,आरोग्य सेविका जयश्री जगताप, कोतवाल एकनाथ धुमाळे, कर्मचारी सुरेश शितापे, पांडूरंग बल्लाळ, यांच्यासह जिल्हा परिषदेचे शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, उपस्थित होत्या.

error: Content is protected !!