जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आधिकारी श्री. पांडुरंग शेंडगे यांचे कोरोनाने निधन

हातकणंगले / प्रतिनिधी


कुंभोज ( ता.हातकणंगले ) येथील प्रतिष्ठित नागरिक तालुक्यातील अनेक सेवा संस्थाचे मार्गदर्शक , कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हातकणंगले तालुक्याचे विभागीय आधिकारी श्री. पांडुरंग मुरलीधर शेंडगे तथा पांडु शेंडगे ( वय -५६ वर्ष ) यांचे कोरोनाने निधन झाले. मागील चार दिवसापासुन पेठ वडगांव येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांची उत्तम प्रशासक म्हणुन ख्याती होती . ते माजी आम. महादेवराव महाडीक यांचे निकटवर्तीय होते . त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत व तालुक्यातील सर्व सेवा सोसायटीतुन हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी , मुली असा परिवार आहे.

error: Content is protected !!