मैदानात कोणीही उतरले तरी तुम्हीच निवडून येणार – शरद पवार

पंढरपूर/ प्रतिनिधी

      राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि शरद पवार (Sharad Pawar) याचे कट्टर समर्थक भारत भालके यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन पर भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज सरकोली येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच भालकेंच्या आठवणींना उजाळा दिला.

      यावेळी शरद पवार म्हणाले की, काही गोष्टि तुमच्या आमच्या हातात नसतात, पंढरपूरच्या विकासासाठी भारतनानांनी मोठी धडपड केली, भारतनाना जरी आपल्यात राहिले नाहीत तरी त्याचे कर्तुत्व आणि त्यांची माणुसकीचि भावना विसरता येणार नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीत भारतनानांनी मला साथ दिली. ते मला सांगायचे की या ठिकाणहून विरोधी पक्षातील हा उमेदवार उभा आहे काय करायचं? तर मी त्यांना सांगायचो त्यांना निवडणूक लढवायची आहे तर लढवू द्या. मैदानात कोणीही उतरले तरी तुम्हीच निवडून येणार.

     भारत भालकेंचा (Bharat Bhalke) आपल्याला कधीही विसर पडणार नाही. भारत भालकेंचं अकाली निधन मनाला चटका लावणारं आहे. नानांचे राहिलेले अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची काळजी आपण घ्यायची आहे. त्यासाठी शक्यतो ती मदतकरणार आहो. काही दिवसात पुन्हा पंढरपूरला येईल.नानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्थकारणावर तोडगा काढू, अशी ग्वाहीही पवारांनी यावेळी दिली.

error: Content is protected !!