राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

इस्लामपूर / जितेंद्र पाटील
    राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंतराव पाटील यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. जयंतराव पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत.


    “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद” असे ट्विट ना.जयंतराव पाटील यांनी केले आहे.(NCP Leader Jayant Patil Tests Covid 19 Positive)

error: Content is protected !!