हातकणंगलेत वीस पैकी दहा ग्रामपंचायतीत सत्तांतर ; प्रस्थापित धक्क्यात , तालुक्यात आनंदोत्सव

हातकणंगले / प्रतिनिधी
   मोठ्या ईर्षेने झालेल्या हातकणंगले तालुक्यातील २० ग्रामपंचायतीचा निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये दहा ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून ९ ग्रामपंचायती मध्ये सत्ता कायम राहीली आहे. एकमेव खोची ग्रामपंचायतीत समिश्र सत्ता आली असून तालुक्यातील तासगाव ही एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडीनंतर विजयी उमेदवाराच्या सर्मथकानी गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. मोठ्या ग्रामपंचायती असतानाही अवघ्या तीन तासात प्रशासनाने मतमोजणी प्रकीया पार पाडली. वीस ग्रामपंचायतीसाठी नोटासाठी झालेले २ हजार९४१ मतदान उमेदवार व नेत्यासाठी चिंतन करायला लावणारे ठरले आहे.

    ग्रामीण राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गेले १५ दिवस प्रचार शिगेला पोहचला होता. प्रचारादरम्यान प्रंचड ईर्षा पहायला मिळाली , असून आरोप प्रत्यरोपाने वातावरण ढवळून निघाले होते. निवडणूकीत पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक गटातच टोकाची ईर्षा रंगली होती. त्यामुळे १५ तारखेला चुरशीने ८६.८२ टक्के इतके उच्चांकी मतदान झाले होते . त्यामुळे निकालाकडे सर्वाचे लक्ष लागून राहीले होते .
     आज सकाळी आठ वाजता प्रांताधिकारी डॉ विकास खरात, तहसिलदार प्रदीप उबाळे , अप्पर तहसिलदार शरद पाटील, नायब तहसिलदार दिगबर सानप आदिच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळ पासूनच झुंडीने कार्यकर्ते तहसिल कार्यालयाच्या आवारात जमा होत होते . निकाल लागेल तसा कार्यकर्त्याचा जल्लोष सुरू होता. हौशी कार्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीसांकडून प्रयत्न सुरू होते.

     तालुक्यातील एकमेव तासगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून उर्वरीत वीस ग्रामपंचायतीचा २५९जांगासाठी ५८२ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ३० जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरीत २२९ उमेदवार आज विजयी घोषीत करण्यात आले. गावनिहाय विजयी उमेदवाराना मिळालेली मते अशी.

१ ) पाडळी ग्रामपंचायत घोगराई विकास पॅनेल यांनी बाजी मारून सत्तांतर झाले , निवडून आलेल्याची नावे , मिळालेली मते, निवृत्ती गणपती वाघमोडे,, ( ३४३ ), शिवाजी राजाराम पाटील ( 3५१ ) सुजाता सुभाष पाटील ( 3५७ ), रविंद्र वसंत पाटील – मेथे ( 3४० ) भाग्यश्री निवृत्ती गायकवाड ( 3४४ ) ऐश्वर्या अनिकेत पाटील ( 3४3 ), श्रीधर सुभाष पाटील ( २९६ ), विभा दिपक पाटील ( २९९ ), कोडींबा पाडूरंग पोवार ( 3८५ ), उषा वसंत दाभाडे ( 3७९ ) नुरजहाँ दरवेशी शेखमलंग ( ३९९ )

२ )मनपाडळे ग्रामपंचायतीचे सत्ताधारी यांनी सत्ता राखली, विजयी उमेदवार पुढील प्रमाणे . उल्हास मधुकर वाघमारे ( ३२३ ), निता शामराव कुरणे ( २५० ), शिल्पा सुभाष पाटील ( २९९ ), माणिक विलास खांडेकर ( 3८0 ), शंकर शामराव सुर्यवंशी ( २८९ ), बाळाबाई शामराव गुरव ( 3५५ ), अनिल यशवंत घोडके ( २४४ ), राजलक्ष्मी राजेंद्र कुमार पाटील ( २५O ), रायबा हंबीरराव, शिंदे ( २१४ ), अरुणा पाडूंरंग वाघमारे ( २९२ )

३ ) वाठार तर्फ वडगाव ग्रामपंचयतीचे सत्तांतर शंकर चौगुले यांच्या गटाची सत्ता ,विजयी उमेदवार पुढील प्रमाणे, सचिन सर्जेराव कुंभार ( ५९१ ), सुहास महादेव पाटील ( ६00), सुरेखा सचिन मस्के( ५७६), महेश श्रीकृष्ण शिर्के( ३१९), अश्विनी दिलीप कुंभार ( ३00), सुशिला धोंडीबा चौगुले (३२२ ), गजेंद्र शंकर माळी ( ५८४), महेश कृष्णात कुंभार ( ५८८), सुजाता संजय मगदूम ( ३0५ ), राहूल बाबूराव पोवार ( ४४८ ), सचिन आप्पासो कांबळे ( २३६ ), नाजूका राजहंस भुजिंगे( २६० )

४ )हालोंडी ग्रामपंचायत सत्ताधारी विजयी उमेदवार पुढील प्रमाणे. किरण सुंदर कांबळे ( ३२८ ), महावीर आण्णा पाटील ( 3६९ ), वर्धमान महावीर बेळकें( २९१ ), सुनिता महावीर शेटे ( 3५१ ), अजय अशोक पाटील ( 3५२ ),

५ ) किणी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे. सचिन बबन पाटील ( ६७२ ), योगीता रोहीत दणाणे ( ६५८ ) प्रवीण काकासो कुरणे ( ४६२ ), सुजाता विजय धनवडे ( ५४3 ), सुप्रिया सुनिल समुद्रे, ( ५६७ ), संताजी सर्जेराव माने ( ५४0 ), मनिषा रघूनाथ शेळके ( ५६८ )

६ ) बिरदेववाडी ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर विजयी उमेदवाराचे नावे पुढीलप्रमाणे. रामचंद्र नागू नाईक ( १९८ ), सरिता राजेद धनगर ( १८९ ) बाबासो सदाशिव खरात ( १३७ ), संगिता नागेश वाघमोडे ( १३१ ), सतिश दत्तायत्र कागले ( १५७ ), शेवंता मोहन नाईक ( १६१ )

७ ) तिळवणी ग्रामपंचायत मधील विजयी उमेदवार यांची नावे पुढीलप्रमाणे. राजेश बाबासो पाटील ( ३२९ ), मंगल जयसिंग मिणचेकर ( २८३ ) अरुणा योगेश कुंभार ( 3४९ ), निवास श्रीरंग कोळी ( २०० ), निता कुमार चव्हाण ( २0३ ), सुकुमार बाळू चव्हाण ( २८O ), सिंधू रघूनाथ माने ( २७१ ), शबाना दिलावर एकसंबे ( 3१५ ),

८ ) रुई ग्रामपंचायतमध्ये शाहूविकास आघाडीचा झेंडा विजयी उमेदवार यांची नावे पुढीलप्रमाणे.. अवधूत सुधाकर कुलकर्णी , ( ८३५ ), करिष्मा इम्रान मुजावर ( ७१२ ) , शालन बाबूराव बेनाडे ( ८१६ ) , अशोक विश्वास आदमाने ( ५५८ ) .शालाबाई विठ्ठल साठे ( ६३७ ) जितेद्र चिंतू यादव ( २७३ ) रेखा रोहीत पाटील ( ५o८ ) अभयकुमार भालचंद्र काश्मीरे (८२१ ), गीता विष्णू सावंत ( ७७५ युनूस बाबासाहेब मकानदार ( ७०७ ) शकीला उस्मानसो कोन्नूर ( ५९४ ) गौतम भरमू उपाध्ये ( ६३७ ) सुभाष यशवंत चौगुले ( ७७३ ) आश्वनी वैभव पोवार ( ४७४ )

९ ) दुर्गेवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाच जागेपैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या, एका जागेसाठी निवडणूक लागली होती, सचिन धोंडीबा घोलप यांना ( १२३ ) हे विजयी झाले.

१0 ) चंदूर ग्रामपंचायत आवाडे प्रणित सभापती महेश पाटील गटाचे वर्चस्व, विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे… भगवान बिरु पुजारी ( ८२0 ), संजय विठ्ठल जिंदे, ( ८७३ ), रोहणी संजय घोरपडे ( ८६४ ) मारुती आप्पा पुजारी ( ७६५ ), वैशाली दरगोंडा पाटील ( ८७१ ), संदीप वसंत कांबळे ( ६९७ ), अनिता प्रशांत माने ( ८०१ ), ललीता बाबासो पुजारी ( ७४९ ), महादेव सत्तगोडा पाटील ( ७१२ ), सचिन रुपाली पुजारी ( ८३९ ), स्वाती सुधाकर कदम ( ८६0 ), बाबासो देवाप्पा मगंसुळे ( ९११ ), स्नेहल अतुल कांबळे ( ९२७ ), शालन बसगोंडा पाटील ( १११३ ), फिरोज बाबू शेख ( ४८३ ), योगीता सचिन हळदे ( ५७४ ),

११ ) नेज ग्रामपंचायतमध्ये सत्तातर आघाडी विजयी उमेदवार पुढील प्रमाणे, आकाश बाबासो शिंगे ( ४०९ ), शुभम तुषार खोत ( ५५३ ), ज्योती अरविंद नेर्ले ( २९४ ), मनोज धोंडीराम कांबळे ( 3५८ ) सजाबाई गोपाळ कांबळे ( 3७९ ), हनिफा जाकीर मुल्ला ( 3५३ ), अमोल बाळासो चव्हाण ( २८४ ), ज्योती दिपक नेजकर ( २९३ ) रमेश बापू घाटगे ( 3६७ ), दिपाली सदाशिव गोंधळी ( ४७४ ) विद्या संदीप चव्हाण, ( ५४२ )

१२ ) माणगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास आघाडी या सत्ताधारी गटानेच बाजी मारली विजयी उमेदवार यांची नावे .. मनोज कुबेर आदाणा ( ५५२ ), बन्ने वसुधा दत्तायत्र ( ५९३ ), अमर सुरेद्र उपाध्ये, ( ६६८ ), सुधाराणी मनोज पाटील ( ७७३ ), अभय आप्पासो मगदूम ( ८०६ ), स्वप्नील अविनाश माने. ( ७६८ ), नितीन पाडूरंग कांबळे ( ६३४ ), संध्याराणी पोपट जाधव ( ५५२ ) गुलाब अख्तर हुसेन भालदार (.५६९ ), प्रकाश पायगोंडा पाटील ( ६१५ ) रमिजा अमजद जमादार ( ५८0 ), राजगोंडा सिंदगोडा पाटील ( ४४९ ), विद्या उमेश जोग, ( ४२९ ),

१३ ) जंगमवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर कॉग्रेस व भाजप यांची सत्ता विजयी उमेदवाराचे नावे पुढीलप्रमाणे. चंपाबाई सुभाष खोत ( १७० ), महानंदा चिंदानंद खोत ( १७० ), संभाजी बळवंत मोरे ( १०९ ) चंपाबाई सुभाष खोत ( ११८ ), चिंदानंद शंकर खोत ( ९८ ), स्नेहा शशिकांत खोत (८७ ),

१४ ) मिणचे ग्रामपंचायतीमध्ये युवा शक्ति आघाडीची सत्ता कायम . विजयी उमेदवार यांची नावे संभाजी भिमराव जाधव ( ४३७), सावित्री शंकर नाईक ( ४६४ ), सविता यशवंत वाकसे ( ४७८ ), अभिनंदन जिनपाल शिखरे ( २८२ ) शाकीरा अकबर मुजावर ( २७७ ), महादेव आणा परीट ( २९३ ), नलिनी यशवंत जाधव ( २५५ ) सुजीत सुकुमार वायदंडे, ( ३४१ ), निलम भगवान घाटगे, ( ४४१ ), अजय संभाजी कांबळे ( ४४५ ), जब्बार ईलाई मोमीन ( ४२७ ), रंजना अशोक जाधव ( ४४९ ),

१५ ) वाठार तर्फ उदगाव ग्रामपंचायतीमध्ये जनसुराज्य पक्षाने विजयाचा झेंडा रोवला. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे. मारूती शंकर शिंदे ( ४४९ ), ताई लक्ष्मण अनूसे ( ४६५ ), शोभा निवृत्ती शिंदे ( ४१९ ), कृष्णा पाडूंरग वठारकर ( ४२८ ) जावेद चंदूलाल पाथरवट ( ४५१ )रिना प्रवीण शिंदे ( ४७९ ), विजय श्रीपाल कागवाडे, ( २३0 ), मंगल बबन परीट ( २३५ ) दत्तायत्र रामचंद्र पाटील ( ३१२ ), कोमल स्वप्नील शिंगे ( ३08 ), उज्वला बाजीराव शिंगे, ( २५७ )

१६ ) लाटवडे ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.. बाळासो तुकाराम भोपळे ( ५२० ), किरण मोहन धनगर ( ३४८ ), राधीका सचिन पाटील ( ४६१ ), संभाजी शामराव पवार ( ५८९ ), रेखा शिवाजी नाईक ( ५७० ) निशा वसंत पाटील ( ५०३ ), किरण राजाराम पाटील ( ४२८), दिनकर बाबूराव पाटील ( ४३२ ), स्वाती उत्तम पाटील ( ४१0 ), महादेव ,राजाराम पाटील ( ४४४ ), हर्षदा कृष्णात कांबळे ( ४८० ), विमल अशोक कोळी ( ४९७ )रणजीत सदाशीव पाटील ( ५१९ ) नलिमा बाजीराव सकटे ( ४७२ ),

( १७ )कबनूर ग्रामपंचायतमधील विजयी उमेदवार, समीर बाबूभाई जमादार ( १२४९ ) सुधीर सात्तापा लिगाडे ( १५२० ) सुनिता सुरेश आडके ( १०२५ ), मधुकर देवाप्पा मणेरे ( ८६३ ), रजनी रमेश गुरव ( १४२६ ), रोहिणी शिवानंद स्वामी ( १३७0 ),उत्तम इरगोंडा पाटील ( ८६९ ), स्वाती नितिन काडाप्पा (८५४ ) साहिफ शहाबुद्दीन मुजावर ( १०९३ ) अर्चना सुधीर पाटील , सिंधू रंगराव महाजन ( ६८८ ) ( ११०५ ) कुमार मारुती कांबळे ( १२४८ ), सुलोचना संजय कट्टी , शोभा शंकर पोवार ( ७९५ ),( ८५७ ), सुनिल धनपाल काडाप्पा ( १६११ ), प्रवीण सुरेश जाधव ( १४७० ), सुधाराणी किशोर पाटील ( १४५६ )

(१९ ) खोची ग्रामपंचायीमधील विजयी उमेदवार नावे… प्रमोद बाबासो सुर्यवंशी ( ४३२ ), स्वाती राजराम सिध्द ( ४१0 ) प्रमोद प्रकाश गुरव ( ३१८ ) वैशाली दिपक वाघ ( २९७ ), राजकुमार सयाजी पाटील ( २२१ ) प्रतिक्षा अमोल आडके ( २४० ), जगदीश भिमराव पाटील ( ४४६ ) पूनम आशिष गुरव ( 3८२ ), स्नेहा सचिन पाटील ( ४०६ ) सुहास पंडीतराव गूरव ( २७८ ) कमल रघूनाथ ढाले ( २७९ ), रोहीणी दादासो पाटील ( ३१० )

( २० )माणगांववाडी येथून सागर खोत , व दिपाली जितेंद्र खोत बिनविरोध भाऊसो महादेव खोत ( १६४ ) , पुष्पलता सखाराम कुंभार ( १७०), सुजाता मधुकर खोत ( १५७ ), बाळासो आण्णाप्पा खोत ( ११६), आकाशी भाऊसो मायगोंडा ( १०९ ) ,

यापैकी किणी मिणचे, माणगाव,हालोंडी, दुर्गवाडी, कुंभोज, कबनूर, रुई, माणगाववाडी या नऊ गावात सत्ता कायम राहीली आहे. तर पाडळी, मनपाडळे , वाठारतर्फ उदगाव, बिरेदववाडी,नेज,चंदूर, तिळवणी जंगमवाडी, वाठार तर्फ उदगाव, लाटवडे या दहा गावात सत्तातर झाले आहे, तर एकमेव खोची गावात समिश्र सत्ता आली आहे.

५८२ उमेदवारापैकी अनेक मातब्बर या निवडणूकीत पराभूत झाले असून यामध्ये प्रामुख्याने खासदार धैर्यशील माने यांचे कट्टर सर्मथक झाकीर भालदार, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण मगदूम, यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

रुई येथे मोठया ईर्षने मतदान झाले असून यामध्ये एका उमेदवाराचा केवळ दोन मतानी तर . दुसऱ्या एका उमेदवाराचा अवध्या तीन मतानी पराभव झाला. प्रभाग दोन मधून दिपाली सकटे, यांना ५४१ तर वर्षा घायतिडक यांना ५3९ प्रभाग सहा मधून अश्वीनी पोवार यांना ४७४ तर सपना शिंदे यांना ४७१ मते मिळाली केवळ दोन व तीन मतानी पराभव झाल्याने पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी मागणी फेटाळात विषयाला पुर्ण विराम दिला.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!