गारगोटी /आनंद चव्हाण
भुदरगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला . त्यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये अनेक ठिकाणी सत्तांतर झाले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दबदबा कायम ठेवला, आज सकाळी आठ वाजता गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठाचे क्रीडा संकुल येथे सुरूवात झाली, जाहीर झालेल्या निकालात शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले, काही गावांत स्थानिक आघाडीने यश मिळवले आहे . भाजपा प्रदेशाध्यक्ष आ चंद्रकांतदादा पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेला यश मिळाले, विशेष म्हणजे या गावात शिवसेनेच्या विरोधात सर्व गट एकत्र आले होते, या गावात ९ पैकी ६ जागा शिवसेनेला मिळाल्या तर विरोधकांना ३ जागांवर समाधान मानावे लागले, तर म्हसवे येथे राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली. म्हसवे व खानापूर गावच्या निकालकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.

निवडणुकीमध्ये शिवसेनेकडे खानापूर, कलनाकवाडी,बसरेवाडी, एरंडपे खेडगे, बारवे, डेळेचिवाळे, नवले, नितवडे,भेंडवडे,बामणे, पंडिवरे मेघोली, शिवडाव अशा . तर राष्ट्रवादी कॉग्रेसकडे आंबवणे , फणसवाडी , नाधवडे , तांब्याचीवाडी, बेडिव म्हसवे , म्हासरंग, भालेकरवाडी , पळशिवणे , बिद्री, पेठ शिवापूर, सोनुर्ली, मिणचे खुर्द या ग्रामपंचायती आल्याचे दिसून येत आहे.
संमिश्र आघाडीमध्ये आदमापूर , नवरसवाडी, गंगापूर, मोरेवाडी, नांगरगांव, नागणवाडी, पाेगिरे, बेगवडे, ममदापूर, मानी मठगांव , सालपेवाडी व लोटेवाडी पाळ्याचाहुडा, दोनवडे, हेळेवाडी, नादोली ग्रामपंचायतींचा साधारणत: समावेश दिसून येतो.
दरम्यान निवडनुक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी फटाक़्यांची आतिशबाजी केली, विजयाच्या घोषणा देत गुलाल उधळला. आज गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच़्या आवारात असलेल्या क्रिडा संकूलात शांततेने मतमोजणी झाली. या परिसरात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने छावणीचे स्वरुप आले होते.