नवरात्रोत्सवात भक्त घरी आणि पुजारी ,बलुतेदार देवाच्या दारी ; ग्रामपंचायतीने ग्रामदैवत भैरवनाथचा ‘देवूळबंद’ निर्णय

बोरपाडळे /प्रतिनिधी यावर्षी
    भक्तांसाठी ‘देवूळबंद’ चा निर्णय बोरपाडळे ग्रामपंचायतीने घेतला असून ग्रामदैवत भैरवनाथच्या मंदिरात यावेळी नवरात्रोत्सवात भक्त घरी आणि पुजारी ,बलुतेदार व पोलीस पाटील देवाच्या दारी अशी परिस्थिती आहे.

     या क्रांतिकारक निर्णयाने कोरोना महामारीस अटकाव करण्याचा प्रामाणिक हेतू असल्याचे ग्रामपंचायतीच्या कोरोना दक्षता समितीनेही असा विधायक निर्णय घेतला असून पंचक्रोषीतील काही गावामध्येही असाच निर्णय झालेला आहे.
    ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता समितीने यासंदर्भात आदर्श आचारसंहिता केली असून यावर्षी नवरात्रौत्सव नसल्याने स्वतःच्या घरीच देवाचे पूजन करावयाचे असून मंदिरात उपवास करणाऱ्या भक्तांसह अन्य भाविकांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.या कालावधीत होणाऱ्या आरती तसेच जागरण कालावधीतही नियमांचे कडक पालन होणार आहे. या नियमावलीमुळे सोने लुटण्याचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. बाहेरगावातील भक्तांना तेल घालण्यासाठी यावर्षी प्रथमच निर्बंध आल्याने मंदिरातील देव प्रथमच सर्व भक्तांच्या मनमंदिरामध्ये विराजमान असतील एवढे नक्की…..

error: Content is protected !!