भाजपा जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे व पदाधिकारी यांचा होणार पाहणी दौरा ; नुकसान भरपाई मिळवून देणेसाठी करणार प्रयत्न …

हातकणंगले / प्रतिनिधी
      कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्ग व सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असताना गेले तीन ते चार दिवस अवकाळी व ढगफुटी सारख्या पावसाने थैमान घातले आहे. शेतकरी वर्गच्या तोंडचा घास डोळ्यासमोर वाहून कुजून गेला आहे . अनेक पिकांना कोंब फुटले आहेत तर अनेक पिके पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . ऐन दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर ही परिस्थिती आल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून आता पोटाची खळगी कशी भरायची हा प्रश्न त्याचेसमोर आहे.
    या नुकसानीची शासनाने तात्काळ पाहणी करून घराची झालेली पडझड, तसेच शेतीची झालेली नुकसान भरपाई तात्काळ देणेसाठी योग्य ते निर्णय तात्काळ घेणेची गरज आहे.
      याच संदर्भात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंहराजे घाटगे यांचे सह सर्व पदाधिकारी , जि प सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक हे सॊमवार दि 19 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी शिरोली (पु) येथे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करणार असून शेतकरी व सर्वसामान्य जनता यांना याची भरपाई मिळवून देणेसाठी प्रयत्न करणार आहोत .

error: Content is protected !!