इस्लामपूर / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी कायार्नुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी क्षेत्रातील विद्यार्थी आपआपल्या गावी शेतक-यांना मार्गदर्शन करत आहेत. रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम जयसिंग डांगे याने साखराळे (ता. वाळवा) येथील शेतक-यांना औषध फवारताना सुरक्षा किटचे महत्त्व याबाबत माहिती दिली.

कृषी महाविद्यालयातील सहका-यांच्या मदतीने शेतक-यांपर्यंत सुधारित तंत्र पोहचविण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी शेतक-यांना विविध विषयांचे मार्गदर्शन करत आहेत. औषध फवारणी, बीज प्रक्रिया, पाणी व्यवस्थापन, मशागत, सुधारित तंत्रज्ञान यासह विविध विषयांची माहिती शेतक-यांपर्यंत पोहोचवत आहेत. शेतक-यांना प्रात्यक्षिके करून दाखवत आहेत. शेतक-यांना या उपक्रमाचा फायदा होत आहे.