राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनेल कडून निवडणूक लढविणार
कोल्हापूर / प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची वेळ अंतिम टप्प्यात आली आहे. विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीकडून हातकणंगलेचे शिवसेनेचे माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर यांचे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून नाव निश्चित झालेले समजते.

जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत हातकणंगले शिरोळमध्ये मतदारांची संख्या कमी असल्याने दोन्ही तालुक्यात म्हणून एखाद्याला संधी मिळत असते. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून डॉ. मिणचेकर यांनी मागणी केली होती. एक प्रबळ दावेदार आणि हातकणंगले शिरोळ तालुक्याला प्रतिनिधित्व देण्यासाठी डॉ. सुजित मिणचेकर यांचे नाव आघाडीच्या नेत्यांनी निश्चित केल्याचे समजते.
आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. संजय मंडलिक, माजी खा. निवेदिता माने, आमदार विनय कोरे यांनी उमेदवारी निश्चित केली. कोल्हापूर येथे झालेल्या नेत्यांच्या बैठकीत डॉक्टर सुजित मिणचेकर यांची उमेदवारी निश्चित झाली .
