रूई येथील साई कॉलनीतील नागरिकांच्या वतीने मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा भव्य सत्कार

       विधानसभा निवडणुकीपूर्वी साई कॉलनीतील रस्ता माझे फंडातून पूर्ण करून देणार असा शब्द आमदार साहेबांनी दिला होता तो शब्द खरा करत सदर रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन प्रसंगी साहेबांचे साई कॉलनीतील नागरिकांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले व भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी स्वागत प्रास्ताविक करताना पत्रकार भाऊसाहेब फास्के म्हणाले विद्यमान कोणी असो पण जनतेच्या मनातील आमदार तुम्हीच आहात व कायम राहणार असे गौरवोद्गार काढले. तसेच मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने त्यांच्या माध्यमातून हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी भरीव निधी खेचून आणावा असे मत व्यक्त केले.

      यावेळी कार्यक्रमास राजाराम झपाटे सर जयसिंग शिंदे शाखाप्रमुख अविनाश शिंदे राजू कमलाकर संजय चौगुले शितल शिंदे जयपाल माने सुशांत कमलाकर व इतर मान्यवर तसेच साई कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!