बीड/प्रतिनिधी
परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र जिल्हा बीडच्यावतीने विविध सामाजिक कार्यात आपले महत्वपूर्ण योगदान देणार्या पाच मान्यवरांना जीवन गौरव, ब्रह्मसेवक आणि ब्राह्मभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले तर बीडचे भूषण असलेले स्व.भरतबुवा रामदासी यांना मरणोत्तर ब्रह्मरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. हे पुरस्कार द्वाराचार्य महंत अमृत महाराज जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम नगर रोड बीड येथे असलेल्या साई पंढरी मंगल कार्यालयात दि.17 डिसेंबर 2020 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमाकांत निर्मळ तर प्रमुख पाहुणे म्हणून द्वाराचार्य अमृत महाराज जोशी, प्रज्ञाताई रामदासी, नंदु महाराज रामदासी, दिलीप उबाळे, संत डाके, ऋतुपर्ण रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील ख्यातनाम राष्ट्रीय कीर्तनकार स्व. भरतबुवा रामदासी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करुन दिशा देण्याचे कार्य केले. त्यांची रसाळ व मधूर वाणीने अनेकांच्या जीवनात बदल घडून आलेले आहेत, कै.भरतबुवा रामदासी यांना परशुराम संस्कार सेवा संघाच्यावतीने त्यांच्या कार्याचा गौरव करुन मरणोत्तर ब्रह्मरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या सौ.मंगलताई आगवान यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर संभाजीनगर येथील सचिन वाडे पाटील, बीड येथील विजय (बाळासाहेब) थिगळे यांना ब्रह्मभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच पाथरील येथील लक्ष्मीकांत काका दडके व बीड येथील संजयराव कुलकर्णी यांच्या समाजसेवेबद्दल त्यांना ब्रम्हसेवक पुरस्काराने सन्मान करुन सर्व पुरस्कारार्थींना संघटनेचे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे द्वाराचार्य महंत अमृत महाराज जोशी यांनी योग्य व्यक्तींना पुरस्कार दिल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकार्यांचे तोंड भरुन कौतुक केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी ब्राह्मण समाजाला एक होण्याची गरज आहे. एकत्रित येवून आपल्या समाजातील चांगले कार्य करणार्या व्यक्तींचा गौरव व कौतूक करणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. तर डॉ. रमाकांतराव निर्मळ यांनी संघटना कामाचे कौतुक केले. तर प्रज्ञाताई रामदासी यांनी भरतबुवा रामदासी यांचा कार्यास उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविपक ॠतुपर्ण रामदासी यांनी केले तर सुत्र संचालन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार केले मंगलताई आगवान यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबा पाठक, संदीप जोशी, रमाकांत कुलकर्णी, सुषमा थिगळे, मंगलताई केंडे, अर्चना जोशी, शुभांगी झेंड, अमृता जोशी, प्रसाद कुलकर्णी, मनोज गोले, नितेश पाठक, ओंकार देशपांडे, ओंकार लिंग्रस, कमलाकर बेहेरे, संतोष बेहेरे, प्रकाश जोशी, विनोद रामदासी, प्रसाद कुलकर्णी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुमोल परिश्रम घेतले.