संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रा.अभिजित पाटील यांना पीएच डी पदवी प्रदान

  संजय घोडावत विद्यापीठाच्या मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागाचे प्राध्यापक अभिजित अरविंद पाटील यांना विश्वेश्वरैय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाकडून नुकतीच पीएच.डी पदवी प्राप्त झाली.” ऑगमेंटेशन ऑफ लॅमिनार फ्लो हिट ट्रान्सफर विथ एक्वीस्पेस्ड ट्यूब इन्सर्ट अँड इट्स स्कोप इन्वेस्टीगेशन फॉर शुगर इंडस्ट्री ” हा त्यांच्या पीएच.डी चा मुख्य विषय होता. प्रा. पाटील यांना संशोधन मार्गदर्शक डॉ.पी.बी. गंगावती आणि सहमार्गदर्शक डॉ.यु.सी.कपाले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याव्यतिरिक्त दत्त सुगर फॅक्टरीने त्यांच्या या संशोधनास स्पॉन्सरशिप दिली असून त्यांना चीफ केमिस्ट श्री.डी.डी.शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

  या प्रकल्पामुळे साखर कारखान्यामध्ये जास्त प्रमाणात ऊर्जेची व वेळेची बचत होणार असून कमी काळात जास्त ऊस गाळप करता येणार आहे. याव्यतिरिक्त मेंटेनन्स व एवापोरेटर साठी होणारा खर्च कमी होणार आहे.
डॉ.अभिजित पाटील यांचे प्राथमिक, माध्यमिक व पदवी पर्यंतचे शिक्षण सांगली मध्ये झाले.मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये त्यांनी पदवी धारण केली असून पुढे त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण अर्थातच एम टेक इन हीट पॉवर इंजिनीरिंग वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केले. तसेच यानंतर त्यांनी २०२० साली विश्वेश्वरैय्या विद्यापीठातून आपले पीएच.डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
  डॉ.अभिजित पाटील यांनी अधिव्याख्याता ते विभागप्रमुख इत्यादी महत्वाच्या पदावर काम केले आहे. त्यांना शिक्षण क्षेत्रात १३ वर्षाहून अधिक अनुभव आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व कौशल्य वाढीसाठी अनेक राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. त्यांनी आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये नाविन्यता आणत विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीचा अवलंब केला आहे. त्यांच्या समुपदेशनामुळे प्रभावित झालेली हजारो विद्यार्थी आज राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम करीत आहेत. याचबरोबर त्यांनी भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तज्ज्ञ व्याख्याता म्हणून विविध विषयावर व्याख्याने दिली आहेत.
  डॉ. पाटील यांनी इंटरनल क्वालिटी अशुरन्स सेल चे प्रमुख, नॅक, इंडस्ट्री युनिव्हर्सिटी इन्टेरॅक्शन तसेच स्टुडन्ट इंटर्नशिप इत्यादी महत्वाच्या समित्यांवर काम केले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये ७ तर आंतरराष्ट्रीय परिषदेत ६ शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी १० हुन अधिक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपले शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. ते इंडियन व अमेरिकन सोसायटी फॉर हीटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनीअर्स आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन या संस्थांचे आजीव सदस्य आहेत.
याबाबत बोलताना डॉ.पाटील म्हणाले ”साखर कारखान्यामध्ये कमी वेळेत जास्त ऊस गाळप करण्याच्या हेतूने मी हा विषय निवडला. माझ्या या संशोधन कार्यात माझे आई वडील, पत्नी सौ.मेघना, मुलगा चि.यश, मित्रपरिवार, सहकारी व एस जी यु मॅनेजमेंट यांचे सहकार्य लाभले.
  संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत, विश्वस्त श्री. विनायक भोसले, कुलगुरू डॉ.एम.टी. तेलसंग, कुलसचिव डॉ एन.के.पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन

error: Content is protected !!