तुम्हाला हे माहितीये का? कसे निर्धारित केले जातात इंधनाचे दर?

  एकिकडे इंधन दरवाढीसाठी अनेकदा केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात असतानाच दुसरीकडे केंद्राच्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठरतात. लोकांच्या या मानसिकतेत अर्धवट माहितीची भर टाकून पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठरत असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं. पण, अर्धसत्य असल्याचं पेट्रोल डिलर असोसिएशनच म्हणणं आहे.

  जेव्हा कच्च्या तेलाच्या दरात जागतिक पातळीवर वाढ होते, तेव्हा सरकार लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवतं. मात्र, जेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती कमी होतात. तेव्हा मात्र लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले जात नाहीत. 2013 साली जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत 150 रुपये प्रति बॅरल होती. तेव्हा पेट्रोल 75 तर डिझेल 65 रुपये प्रतिलीटर होतं. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत 52 रुपये प्रतिबॅरल असताना पेट्रोल नव्वदी पार तर डिझेल 80 पार पोहचलं आहे.

तुम्हाला हे माहितीये का? 

   सध्या पेट्रोलचा दर 91 रुपये प्रतिलीटर दिसत असला तरी केंद्र सरकारला त्यासाठी प्रतिलीटर सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयेच मोजावे लागतात. उरलेले 63 ते 64 रुपये सरकारकडून वेगवेगळ्या करांच्या नावाखाली वसूल केले जातात. एका लिटरमागे लोकांना 32 रुपये 98 पैसे एक्साईज ड्युटी म्हणून द्यावे लागतात. व्हॅटच्या स्वरुपात 15 रुपये 91 पैसै एका लिटरमागे साणान्यांना द्यावे लागतात.

    राज्य सरकारच्या सेससाठी प्रतिलीटर पेट्रोलसाठी दहा रुपये 12 पैसे द्यावे लागतात. तर पेट्रोलपंप चालकांच्या कमिशनपोटी एक लीटर पेट्रोलमागे तीन रुपये 64 पैसे द्यावे लागतायत. आणि या सगळ्यांचा परिणाम पेट्रोल 91 रुपये प्रतिलीटरवर पोहोचण्यात झाला आहे. डिझेलच्या बाबतीतही चित्र वेगळं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!