राधानगरी / प्रतिनिधी
पडळी ( ता राधानगरी) येथील पीडित युवतीच्या कुटुंबियांना शिरोळमधील फुले- शाहू- आंबेडकर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दीपावली भाऊबीज म्हणून बुधवारी 50 किलो धान्य व 7 हजार रुपयांची भेट दिली, यावेळी चव्हाण परिवारासह चर्मकार समाजातील उपस्थित सर्वजण भावुक झाले.

राधानगरी तालुक्यातील पडळी येथील चर्मकार समाजातील युवतीवर अत्याचार करून तिला व तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली , तसेच तिच्या भावावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ चर्मकार समाजाचा महामोर्चा काढण्यात आला होता . या घटनेची दखल घेऊन शिरोळमधील फुले शाहू आंबेडकर संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते दगडू माने, राजेंद्र प्रधान, धनंजय माळी, रुकैया केरुरे यांनी धान्य व आर्थिक स्वरूपाची मदत ” त्या ” कुटुंबीयांकडे सुपूर्द करून त्यांना आधार दिला, यावेळी राधानगरीमधील चर्मकार समाजाचे नेते राजेंद्र चव्हाण ,आनंदराव चव्हाण, सुरेश चव्हाण, एम के चव्हाण, सागर चव्हाण ,प्रकाश चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान, राधानगरी येथे मदत देण्यासाठी शिरोळचे बाळासाहेब कोळी (दिवाण ), महादेव कदम याच्यासह राजेंद्र दाभाडे, फिरोज मुजावर, बबन पुजारी ,पंडितराव काळे, गोरखनाथ माने, अशोकराव शंकर कांबळे, रामदास भंडारे ,पांडुरंग गायकवाड, धनंजय माळी ,दगडू माने, राजेंद्र प्रधान यांचेकडून याकामी मदत लाभली , दिवाळीच्या निमित्ताने पीडित युवतीच्या कुटुंबियांना थेट भेटून आपुलकीचा आधार देत भाऊबीज म्हणून सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहून सर्वजण भावुक झाले होते .