गुटखा तस्कर व्यापारी अमोल लोळगेला अटक ;लाखोच्या गुटख्यासह चार चाकी जप्त


इचलकरंजी /प्रतिनिधी

     पेठवडगाव ( ता. हातकणंगले ) येथील गुटखा तस्कर व्यापाराला पहाटेच्या सुमारास पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अमोल अरुण लोळगे ( वय ४० , रा . पदमा रोड , वाणी पेठ , पेठवडगाव , ता . हातकणंगले ) असे गुटखा तस्कराचे नाव आहे.
   अनेक वर्षापासुन कर्नाटकातुन महाराष्ट्रात गुटखा तस्करी बोरगांव सीमेवरून अन्न व औषध प्रशासनाच्या आणि पोलीसांच्या आशीर्वादाने खुले आम मोठ्या प्रमाणात बिनदिक्कत सुरू आहे. याची दखल घेवुन अंशःता प्रमाणात कारवाई गेली जाते . त्याचात एक भाग म्हणुन आज गुटख्याची तस्करी करणाऱ्यास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून एक चारचाकी गाडी आणि विविध कंपनीचा गुटखा, सुगंधी तंबाखू असा लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई इचलकरंजीमधील लिंबू चौक ते शेळके मळा मार्गावर केली असुन पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासनाकडुन होणार की पोलीसांकडून हे समजु शकले नाही.

error: Content is protected !!