नाम. अनिल परब यांची सदिच्छा भेट ; मंत्री यड्रावकर यांनी विकासकामांकरिता केली दोन कोटी निधीची मागणी …..

जयसिंगपूर / प्रतिनिधी
       महाराष्ट्र राज्याचे परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री नामदार अनिल परब यांनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची त्यांच्या जयसिंगपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. श्रीक्षेत्र नरसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी खाजगी दौऱ्यावर आलेल्या नाम. परब यांनी जयसिंगपूर येथे आरोग्य राज्यमंत्री नामदार यड्रावकर यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.

       यावेळी जयसिंगपूर येथील एसटी स्टँडच्या सुरू असलेल्या बांधकामाविषयी नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जयसिंगपूर बसस्थानक अद्यावत असे उभारण्यासाठी आणखी दोन कोटीचा निधी मिळावा. अशी मागणी नामदार अनिल परब यांच्याकडे केली
       याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घेतला जाईल असे नामदार परब यांनी राज्यमंत्री यड्रावकर यांच्याशी बोलताना सांगितले, 2019 मध्ये आलेल्या प्रलयकारी महापुरामध्ये शिरोळ तालुक्यामधील कुरुंदवाड आगारासह कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील अनेक आगारांची बससेवा अनेक दिवस बंद होती पूरबाधित क्षेत्रातील एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीच्या प्रलंबित प्रश्नाविषयी राज्यमंत्री यड्रावकर यांनी नामदार परब यांच्याशी चर्चा केली व एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली,
       यावेळी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शिरोळ तालुका शिवसेना अध्यक्ष सतीश मलमे, आदित्य पाटील-यड्रावकर, प्रा . आण्णासाहेब क्वाणे, नगरसेवक असलम फरास, शितल गतारे, राहुल बंडगर, महेश कलकुटगी, राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख, दादासो पाटील चिंचवाडकर, राजेंद्र झेले, जवाहर पाटील, अमोल शिंदे, संजय नांदणे, संजय बोरगावे, विक्रम खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!