ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार वेठे यांचे निधन ;जिल्ह्यातील अनेक पत्रकारांचा मार्गदर्शक हरपला .

कोल्हापुर / प्रतिनिधी
   ज्येष्ठ पत्रकार, कोल्हापूर प्रेस क्लबचे संस्थापक सदस्य, माजी अध्यक्ष, क्राईम रिर्पोटरांचे मार्गदर्शक नंदकुमार वेठे यांचे आज पहाटे निधन झाले .

      वयाने ज्येष्ठ असूनही तरुण पत्रकारांना मित्रत्वाच्या सल्ल्याने सदैव मार्गदर्शन आणि मदतीचा हात नंदू वेठे पुढे करत असत. पत्रकार असतानाही एखादा छोटा मोठा व्यवसाय करा , म्हणून सर्वांना आग्रह धरत. आज कोरोनाच्या संकटकाळात नंदू वेठेंचे शब्द अक्षरश: खरे ठरले आहेत. पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती मिळाली नाही , तर थेट फिर्यादी आणि तक्रारदाराला गाठून नंदू वेठे माहिती काढत. त्यांचा शिवाजी पेठेतील करारी वागणे पोलिसांला शोभेल असे होते. तक्रारदारांला प्रश्न विचारत माहिती लिहून घेत. वेठे पोलिसच आहेत असे तक्रारदाराला वाटत असे.
     प्रेस क्लबच्या कुठल्याही कार्यक्रमात त्यांचा हिरिरीने सहभाग असायचा. क्राईम रिपोर्टर असोसिएशनचे ते अखेरपर्यंत अध्यक्ष होते. वेठे यांच्या जाण्याने जिल्ह्यातील सर्वच पत्रकार एका चांगल्या मार्गदर्शक पत्रकाराला मुकले आहेत.

error: Content is protected !!