दुसाळे गावचा जवान सचिन जाधव सीमेवर शहीद, शासकीय इतमामात अत्यंसंस्कार ; पाटण तालुक्यावर शोककळा …..

पाटण / विक्रांत काबंळे
     पाटण तालुक्यातील तारळे विभागातील दुर्गम अशा दुसाळे गावातील जवान सचिन संभाजी जाधव लेह लडाख सीमेवर देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना बुधवार ता.१६ रोजी हुतात्मा झाले . त्याचा पार्थिव शनिवारी दुसाळे गावात आणल्यानंतर त्यांचेवर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले . यावेळी सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री बाळासाहेब पाटील , गृहराज्यमंत्री शभूंराजे देसाई , राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर , जिल्हा पोलास प्रमुख तेजस्विनी सातपुते , सातारा सैनिक दलाचे विजय पाटील , पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे , तहसिलदार समीर यादव , गटविकास आधिकारी मिना साळुंखे , उब्रंज पोलिस स्टेशनचे सपोनि अजय गोरड , पाटणचे प्रभारी चद्रंकात माळी यानी श्रध्दाजंली वाहीली

      शुक्रवारी सचिन जाधव यांचे निधनाची माहीती मिळताच दुसाळे गावासह तारळे व पाटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असुन दुसाळे गावावर शोककळा पसरली आहे . दरम्यान हुतात्मा सचिन संभाजी जाधव यांचे पार्थिव पुणे येथे आज (शुक्रवार) रात्री दहा वाजता आणण्यात आले . तेथून ते शनिवारी सातारा जिल्ह्यात आले . त्यानंर तारळे येथून दुसाळे येथे दहा वाजण्याचे सुमारास आणल्यानंतर त्यांचे घरासमोर ठेवण्यात आले . आपला मुलगा सचिनचे पार्थिव पाहताच आई सुरेखा यांनी हंबरडा फोडत ये माझ्या बाळा सचिन मला कारे सोडुन गेला म्हणत रडायला लागल्या तर पत्नी मेघा यांनी आपला नवरा सचिन याचे पार्थीव पाहताच बोलती बंद झाली त्या काही वेळाने शुध्दीवर येताच आपल्या मुलांना का ओ सोडुन गेलात म्हणत हंबरडा फोडला . यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले त्यांना शांत करत सकाळी साडेदहा वाजता
    फुलानी सजवलेल्या ट्रॉलीमध्ये शहीद सचिन जाधव यांचा पार्थिव ठेवण्यात आला . अमर रहे। अमर रहेI सचिन जाधव अमर रहेI भारत माता की जय सचिन जाधव अमर रहे। या घोषणानी परिसर दणाणुन गेला होता . सचिन जाधव यांचे पार्थिवाची मिरवणुक काढुन
    दुसाळे गावातच त्यांचे पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यासाठी चबुतरा करण्यात आला होता . त्याठिकाणी अकरा वाजता त्यांचा पार्थीव आणण्यात आला. पार्थीव चबुतऱ्यावर ठेवण्यात आले . यावेळी मान्यवरांनी पुष्पचक्र वाहत श्रध्दांजली अर्पण केली त्यानंतर सातारा येथील पोलिस दलाच्या पथकाने त्याना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचा ११ वर्षाचा मुलगा आयुष याने आपले वडील शहीद सचिन जाधव यांना भडाग्नी दिला. त्यानंतर सातारा सैनिक दलाचे वतीने मानवंदना दिली . यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. अनेक जण हुंदके ही देत होते . परिसर काही काळ सुन्न झाला होता . आणि शहीद जवान सचिन जाधव अनंतात विलिन झाले . यावेळी तारळे भागासह पाटण कराड ,सातारा तालुक्यातील मान्यवर व नागरिक व अधिकारी सकाळी सहा वाजले पासुनच दुसाळे गावात मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शहिद जवान सचिन जाधव यांना अखेरचा निरोप दिला .

   सचिन जाधव यांचे निधनाची बातमी समजल्यापासुन दुसाळे परिसरातील नागरीक रात्रभर जागे राहुन होते . पार्थिवाची मिरवणुक निघताच पाऊसही काही काळ निरोप देण्यासाठी आला होता . त्या पावसातच नागरीक छत्री न घेता चालत होते .

   आपल्या मुलाचे पार्थिव पाहताच मेजर सुभेदार संभाजी जाधव काही काळ सुन्न झाले होते . पण त्यानी सैन्यात नोकरी केली असल्याने ते सावध होत माझा मुलगा देश संरक्षणासाठी शहीद झाला याचा मला अभिमान आहे . असे म्हणत आपले डोळे पुसत व स्वःताला सावरत आपली पत्नी सुरेखा व सुन मेघा यांची समजुत काढत होते . यावेळी त्यांचा दुसरा मुलगा ही स्वःताला सावरत आईवडीलांना व भावजयला धीर देत होता . यावेळी यांचे देशावर असणारे प्रेम सर्वजन पाहात होते.

error: Content is protected !!