गारगोटी / प्रतिनिधी
जिल्ह्यात चेन स्कॅनरच्या घटना घडत असताना आज गारगोटी येथे अशी घटना घडली, गारगोटी ते गडहिंग्लज रोड या वर्दळीच्या रस्त्यावर आज गारगोटी बाजाराच्या दिवशी रस्त्यावर अडवून निवृत्त मुख्याध्यापकास एका मोटारसायकल वरील युवकाने लुटले,व लाखाचे दागिने लुटून पोबारा केला, याबाबत भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की,पांडुरंग लक्ष्मण कांबळे (वय वर्ष ७० रा गारगोटी ) हे बाजाराच्या निमित्ताने दुपारी गारगोटी बाजारात जात होते, दरम्यान जे पी नाईक कॉलनीसमोर एक मोटार सायकल थांबवून युवकाने पुढे पोलीस असलेचे सांगून गळ्यातील चेन व अंगठी काढणेस सांगितले, व त्याप्रमाणे कांबळे यांनी गळ्यातील पावणे दोन तोळ्याची सोन्याची चेन व बोटातील पाऊण तोळ्याची सोन्याची अंगठी काढली . त्याबरोबर त्या युवकाने ती काढून घेऊन पोबारा केला, याबाबत भुदरगड पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करत आहेत.
पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचा धाक संपला
भुदरगड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून संजय पतंगे हे गेल्या दिड वर्षांपासून कार्यरत होते,त्यांनी तालुक्यातील गुन्हेगारी मुळापासून नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, मटका, दारुअड्डे, जुगार अड्डे उध्वस्त केले, पतंगे खऱ्या अर्थाने गुन्हेगारांचे कर्दनकाळ होते,त्यांचा धाक होता तसाच सामान्य जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास होता,त्यांची गेल्या महिन्यात अचानक बदली झाली, आणि आज ही घटना घडली, पतंगे असते तर अशी घटना घडलीच नसती, संजय पतंगे असतांना जो धाक होता तो संपलेची चर्चा होत आहे.